नांदेड : सर्वसमावेशक विकास संकल्पना सार्थ ठरवत नांदेड जिल्हा विकास क्षेत्रात सदैव आघाडीवर राहील, असा विश्वास पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी व्यक्त केला़ स्वातंत्र्यदिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी सावंत बोलत होते़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी झालेल्या ध्वजारोहन समारंभास माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, जि़प़अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर अब्दुल सत्तार, आ़अमरनाथ राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आ़ओमप्रकाश पोकर्णा, विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ, जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची उपस्थिती होती़ यावेळी सावंत म्हणाले, मंत्रिमंडळाने मराठवाड्यातील १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे़ त्यामध्ये नांदेडमधील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे़ टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सर्वोतोपरी उपाय करण्यात येत आहेत़ यावेळी त्यांनी सेफ सिटी प्रकल्प, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल, पश्चिम वळण रस्ता, उद्योग भवन, कामगार भवन यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले़ सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़ (प्रतिनिधी)
जिल्ह्याची सर्वसमावेशक विकासात सदैव आघाडी
By admin | Updated: August 17, 2014 00:55 IST