शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्याच्या कामावर झटतेय परप्रांतीय फौज

By | Updated: December 2, 2020 04:11 IST

समृद्धी महामार्ग : फेब्रुवारी अखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याची सूचना औरंगाबाद : समृद्धी महामार्ग अर्थात ‘नागपूर- मुंबई सुपर एक्सप्रेस ...

समृद्धी महामार्ग : फेब्रुवारी अखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याची सूचना

औरंगाबाद : समृद्धी महामार्ग अर्थात ‘नागपूर- मुंबई सुपर एक्सप्रेस वे’ हा औरंगाबादसाठी वरदान ठरणार आहे. सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्या कामावर अत्याधुनिक यंत्र व परप्रांतीय निष्णात कामागारांची फौज रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ९० दिवसांची मुदत दिली आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी सोमवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सावंगी जक्शनच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला भेट दिली. चौका घाटाकडे जाताना अलिकडे डाव्या बाजूला डोंगराच्या पलिकडे गेल्यास माळीवाड्याकडून डोंगराच्यापायथ्यापर्यंत या महामार्गाचे काम आले आहे. सध्या तिथे डोंगर फोडण्याचे काम मोठमोठ्या यंत्रांद्वारे केले जात आहे.

जळगावर रोडवर सावंगी जंक्शनचे कामही जोरात सुरू आहे. जळगाव रोडवरून समृद्धी महामार्ग हा मुंबईकडे जाणार असून तिथे उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरू आहे. याशिवाय या महामार्गाला औरंगाबादची कनेक्टिव्ही देण्यासाठी तिथे वाहनांना खाली उतरण्यासाठी व महामार्गावर जाण्यासाठी सुविधा तयार केली जात आहे. त्यालाच ‘जंक्शन’ असे म्हटले जाते.

या जंक्शनपासून पूर्वेला भला मोठा डोंगर असून त्यातून बोगदा तयार केला जात आहे. सध्या जालन्याकडून त्या डोंगरापर्यंत समृद्धी महामार्गाचे काम आले आहे. पोखरी शिवारात असलेल्या हा डोंगर पोखरण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्र, जेसीबी व अन्य यंत्रसामुग्री अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कामावर झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, सिक्कीम येथील अनुभवी कामगारांची फौज जुंपण्यात आली असून २६० मिटर लांबिच्या या बोगद्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची ‘डेड लाईन’ राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘मेग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार संस्थेला दिली आहे.

बोगदा तयार करण्यात येणाऱ्या डोंगराला काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून लोखंडी जाळी बसविण्यात आली असून यंत्राच्या सहाय्याने डोंगराला छिद्र पाडले जाते. त्या छिद्धात स्फोटके भरुन मग त्याचा स्फोट केला जातो. जेसीबी, पोकलेनद्वारे दगडांचा ढीग बाजूला करुन लगेच वरच्या दिशेने व बाजूला आधार देऊन हे काम पुढे केले जाते. सध्या एकाच बाजूने बोगद्याचे काम सुरु असून दुसरे यंत्र आल्यानंतर अलिकडच्या बाजूनेही काम सुरू केले जाणार आहे.

चौकट....

मेपासून रस्ता वाहतुकीचा संकल्प समोर ठेवून अंतिम मुदत निश्चित

यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरुन नाशिकपर्यंत १ मे रोजी वाहतूक सुरू करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीकोनातून फेब्रुवारी अखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मेगा इंजिनिअरिंगला मुदत दिली आहे. ६ पदरी असलेल्या या रस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. २६० मीटर लांबीच्या या बोगद्याचे काम दोन्ही बाजूने केले जाणार आहे. सध्या दुसरे यंत्र येईपर्यंत एका बाजूने काम सुरू आहे. लवकरात लवकर दुसरे यंत्र प्राप्त झाले, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत काम पूर्ण होऊ शकते, असे ते म्हणाले.