शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘अंत्योदय’मधील धान्य कपातीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:40 IST

केंद्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पुरवठा विभागाकडून देण्यात येत असलेल्या धान्याच्या तुलनेत निम्मा धान्यपुरवठा कमी करण्याबाबत शासन दरबारात विचार सुरू झाल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात या योजनेतून सुमारे १ कोटी ११ लाख ३२ हजार ५४९ नागरिकांना धान्यपुरवठा होतो.७ हजार ९०४ मेट्रिक टन गहू, ५ हजार २२७ मेट्रिक टन तांदूळ, असे १३ हजार १३१ मेट्रिक टन धान्य या योजनेतून ३१ आॅक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पुरविले गेले आहे. ४ लाख ९९ हजार रेशनकार्डांवर १ कोटी ११ लाख ३२ हजार ५३९ नागरिकांना अंत्योदय योजनेतून धान्यपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय पुरवठा विभागाच्या रेकॉर्डवर आहे.केंद्राच्या योजनेत राज्य सरकारला ढवळाढवळ करण्याचा काहीही अधिकार नाही. शेतकरी अन्नसुरक्षा योजना असा वा अंत्योदय योजना असू द्या. त्यातील कणभर धान्यदेखील कमी होता कामा नये. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ६० लाख शेतकºयांचे अन्न सुरक्षा योजनेतून पुरविले जाणारे धान्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ हजार कोटी रुपयांचा सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सगळा प्रकार शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. सरकार असे निर्णय घेत असेल, तर त्याचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतील. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील तक्रार करण्याचा इशारा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.