शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकरी समुदायाकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 19:56 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university Namvistar Din अनुयायांची अभिवादनासाठी होणारी गर्दी, विविध पक्ष आणि संघटनांच्या अभिवादन रॅली आणि जाहीर सभांना जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला होता.

ठळक मुद्देनियम आणि शिस्तीचे पालन करत उत्साहात साजरा झाला नामविस्तार दिन

औरंगाबाद : यंदा कोवीडच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठ गेट परिसरात आंबेडकर अनुयायांची अभिवादनासाठी होणारी गर्दी, विविध पक्ष आणि संघटनांच्या अभिवादन रॅली आणि जाहीर सभांना जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला. तरिही याठिकाणी रात्री उशिरापर्यंत अनुयायांनी विद्यापीठ गेट, शहीद स्तंभ आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

सकाळी भन्ते नागसेन, भन्ते एस प्रज्ञाबोधी व भिख्खू संघाकडून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचे आगमन होताच समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचालन केले. किशोर जोहरे व रमेश बनसोडे यांनी संचालनाचे नेतृत्व केले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही बाबासाहेबांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन केले.

गुरुवारी पहाटेपासूनच विद्यापीठ गेटजवळ ठेवण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांना महिला शिस्तीने वंदन करत होत्या. यावर्षी परिसरात गर्दी व गोंगाट नव्हता. विविध ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांची जागा ओसाड दिसत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा पुस्तके, भीम-बुद्ध गितांच्या ध्वनीफीती, मूर्ती, प्रतिमांची दुकाने नव्हती. दरवर्षी याठिकाणी जत्रेसारखी होणारी गर्दी नव्हती. गेटसमोर विविध पक्ष- संघटना व कार्यकर्त्यांची शुभेच्छा फलकेही तुलनेने कमीच दिसून आली. विद्यापीठ गेटच्या डाव्या बाजूला उभारलेल्या पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार पाहणी करत होते.

आंबेडकरी समुदायाकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादनरिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, राष्ट्रीय सचिव संजीव बोधनकर, पीपल्स रिपब्लिकनचे प्रा. जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याध्यक्षा सुर्यकांता गाडे, डॉ. सिद्धांत गाडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, भारतीय कोब्राचे विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डांबाळे, सुवर्णा डंबाळे आदींनी बाबासाहेबांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत विवीध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायांनी आपल्या कुटुंबियासह येऊन शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद