शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अपर पोलीस महासंचालकपदाचा दर्जा कायम राखण्यासाठी शहरात आणखी चार नवीन पोलीस ठाणी वाढण्याची गरज आहे. त्यानुसार पोलीस ...

औरंगाबाद : अपर पोलीस महासंचालकपदाचा दर्जा कायम राखण्यासाठी शहरात आणखी चार नवीन पोलीस ठाणी वाढण्याची गरज आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयांतर्गत शेंद्रा एमआयडीसी आणि रांजणगाव या दोन नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणे, तसेच अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत चिकलठाणा पोलीस ठाण्याचा आयुक्तालयात समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गृहमंत्री, पालकमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

शहर पोलीस आयुक्तपदाचा दर्जा वाढवून तो अपर पोलीस महासंचालक पदाचा करण्यात आला असून, पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांना यापदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना याच ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शासनाच्या इच्छेनुसार येथील पोलीस आयुक्तांचे पद हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे. पुढील काळात या पदाचा दर्जा कायम राहण्यासाठी शहरात चार नवीन पोलीस ठाणी वाढण्याची गरज आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पोलीस आयुक्तालयाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यानुसार करमाड पोलीस ठाण्याचे विभाजन करून शेंद्रा एमआयडीसी हे नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे. चिकलठाणा पोलीस ठाण्याचा समावेशही आयुक्तालयाच्या हद्दीत करावा. वाळूज पोलीस ठाणे आणि ग्रामीणमधील बिडकीन पोलीस ठाण्याचे विभाजन करून रांजणगाव हे नवीन पोलीस ठाणे स्थापन करावे, असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार ग्रामीणमधील पोलीस ठाण्यांचा शहरात समावेश करताना ठाण्यातील नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदासह करावा. जेणेकरून नवीन मनुष्यबळ भरण्याचा ताण शासनावर पडणार नाही. हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गृहमंत्री, पालकमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

-------------------------------

चौकट

दोन डीसीपींची आवश्यकता

शहरात सध्या दोन परिमंडळे कार्यरत आहेत. शहराचा वाढता विस्तार, विविध औद्योगिक वसाहती आणि गुन्ह्यांचे प्रमाण या बाबी लक्षात घेऊन येथे तीन परिमंडळे असावीत. एखाद्या घटनेनंतर पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन बारकावे हेरून तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकरिता एक आणि वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त गरजेचे आहेत, असेही निखिल गुप्ता यांनी सांगितले.

---------------

सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळावी

अपर पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर पोलिसांना काय सांगाल, या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक द्यावी. ठाण्यात जाऊन आल्याचे त्यांना समाधान वाटले पाहिजे, असे वातावरण पोलीस ठाण्याचे असावे.