शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात चारा मिळेना

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

नांदेड : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़

नांदेड : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेने शासनाकडे मागणी केलेला १ लाख ३४ हजार ९६० मे़ टन चारा अद्याप उपलब्ध झाला नसल्याने साडेआठ लाख जनावरांची मे महिन्यात होरपळ होणार आहे़ जिल्ह्यात चाऱ्याअभावी पशुधन संख्या घटत असल्याचे भयावह चित्र पाहण्यास मिळत आहे़ जनावरांना हिरवा व वाळलेला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे़ पशुखाद्य म्हणून ज्वारीचा कडबा, सोयाबीनचे भुसकट या पिकांमध्ये झालेली घट व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविणे कठीण झाले आहे़जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची मागणी शासनाकडे केली होती़ मात्र दोन महिने झाले तरी चाऱ्याच्या मागणीवर शासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही़ त्यामुळे चारा मिळणार की नाही, हा प्रश्न पशुपालकांना पडला आहे़ जिल्ह्यात लहान जनावरे २ लाख ९४३ तर मोठे जनावरे ६ लाख ४९ हजार ३०७ आहेत़ प्रतिलहान जनावराला प्रतिदिवस ३ किलो चारा याप्रमाणे ६ लाख २ हजार ८२९ किलो तर मोठ्या जनावराला ३८ लाख ९५ हजार ८४२ किलो चाऱ्याची आवश्यकता आहे़ त्यानुसार प्रति दिन ४४९८़६७१ मे़ टन तर तीन महिन्यांसाठी १३४९६०़१३ मे़ टन चारा आवश्यकता आहे़ १ नोव्हेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत २९२४१३़६२ मे़ टन चारा वापरात आला आहे़ लहान जनावरांना दररोज तीन किलो प्रमाणे ६०२ टन तर मोठ्या जनावरांना दर दिवशी सहा किलोप्रमाणे साडेतीन हजार टन चारा लागतो़ याप्रमाणे दररोज साडेचार हजार टन चारा लागतो, तर दर महिन्याला १ लाख ३४ हजार ९६० टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ पुढील दोन महिने जनावरांना जगविण्यासाठी मुबलक प्रमाणात चारा आवश्यक आहे़ यासंदर्भात जि़ प़ चे पशुसंवर्धन अधिकारी एम़ यु़ गोहत्रे म्हणाले, मागणी केलेला चाऱ्याची पूर्तता अद्याप झाली नाही़ मात्र शनिवारी झालेल्या विभागीय बैठकीत चाऱ्याच्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे़ (प्रतिनिधी)