शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सिंचन, आरोग्यसह पायाभूत सुविधांवर भर

By admin | Updated: March 15, 2015 00:33 IST

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील

सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९७४ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत राजकारणात सक्रीय सहभाग आहेत. आता येथीलच राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सिंचन, आरोग्यसह पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचे येथे भरीव काम झाले आहे. दरम्यान, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच तेर येथे पहिल्यांदा विशेष बाब म्हणून ग्रामिण रुग्णालय उभारले गेले. त्यापूर्वी ग्रामिण रुग्णालय केवळ तालुका ठिकाणीच उभारण्यात येत असत. या रुग्णालयासाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन दिली. याबरोबरच तेरमध्ये चांगल्या प्रकारचे बसस्थानकही डॉ. पाटील यांच्यामुळेच उभे राहू शकले. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्या माध्यमातून या क्षेत्राततही लक्षवेधी काम झाल्याचे दिसून येते. तेरणा धरणातून गावाच्या पाईपलाईनव्दारे गावात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बरोबरच १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सोयही गावात उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असताना तेरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना उभाण्यात त्यांना यश आले. यामुळे कॅनॉलद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा हेतू होता. मात्र मागील दोन पावसाळे कोरडे गेल्याने पुरेशा पाण्याअभावी या योजनेचा सध्या लाभ होत नाही. गावामध्ये संत गोरोबा काकांचे राहते घर, बौद्ध स्तूप यांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आणणे, गोरोबा काका यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी व मंदिराला ‘ब’ दर्जा मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तेरणा नदीवर (शिरपूर पॅटर्न) सरळीकरण व खोलीकरणाचेही मोठे काम करण्यात त्यांना यश आले आल्याचे गावात फेरफटका मारला असता दिसून येते. विविध विकासकामे करण्यात यश आले असले तरी, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गावातील काही भागात आजही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून व्यापारी संकुलाची उभारणी करावी अशी मागणी असली तरी मुबलक गाळे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.