शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी सणाला फुलांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:28 IST

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव आणि मंगळवारपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुुरु असून त्यामुळे फुलांचे भाव मात्र वधारले आहेत़ फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या बाजारपेठेत १२५ ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सध्या सुरु असलेला गणेशोत्सव आणि मंगळवारपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुुरु असून त्यामुळे फुलांचे भाव मात्र वधारले आहेत़ फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या बाजारपेठेत १२५ ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे़गणेशोत्सव सुरु झाल्यापासून नांदेडच्या बाजारपेठेत दर दिवशी जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे़ नांदेडच्या बाजारपेठेतूनच संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात फुले पाठविली जातात़, परंतु सध्या गणेशोत्सव सुरु असून मंगळवारपासून घरोघरी महालक्ष्मीचे आगमन होणार आहे़ त्यामुळे बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे़ फुलांची आवक घटल्यामुळे भाव दुपटीने वाढले आहेत़ १२५ रुपये ते ३०० रुपये किलो दराने फुलांची विक्री केली जात असून ७०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत रेडीमेड हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ दरम्यान, नांदेडातील फूल मार्केट मराठवाड्यात क्रमांक एक वर आहे़, परंतु सोयीसुविधांची बोंब आहे़ मनपाकडून कुठल्याच सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत़ मालासाठीही जागा नाही़ त्यामुळे आलेला माल मिळेल त्या भावात त्याच दिवशी विकून मोकळे व्हावे लागते, अशी प्रतिक्रिया जिल्हा होलसेल अ‍ॅन्ड रिटेल फूल विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल अलीम खॉन अब्दुल हमीद खॉन यांनी दिली़