शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला पुन्हा पूर, मराठवाडा खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:02 IST

पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून शुक्रवारी सकाळपासून मोठ्या क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमधून जायकवाडीसाठी ४९,४७८ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून शुक्रवारी सकाळपासून मोठ्या क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमधून जायकवाडीसाठी ४९,४७८ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पूर आला असून, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सकाळपासून जायकवाडी धरणात येणारी आवक ४,४१० क्युसेक होती. रात्री १० नंतर आवक वाढण्यास प्रारंभ झाला होता. शनिवारी धरणात ३० ते ४० हजार क्युसेक क्षमतेने आवक अपेक्षित असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. धरणात येणारी आवक लक्षात घेता जायकवाडीच्या जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. शुक्रवारी धरणात ४०.३२ टक्के इतका जलसाठा झाला होता.नाशिक जिल्ह्यात गुरुवारी नाशिक ३२ मि.मी., त्र्यंबकेश्वर ४५ मि.मी., इगतपुरी ७६ मि.मी., घोटी ९८ मि.मी. व बसवंत पिंपळगाव ४० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली होती.दरम्यान, शुक्रवारीसुद्धा नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांपैकी गंगापूर धरण ५,१०९, दारणा धरण ६,६१०, पालखेड धरण १२,१३४, कडवा धरणातून ४,१७६ असा विसर्ग सकाळपासून करण्यात येत आहे. हे सर्व पाणी एकत्रित जमा होऊन नांदूर-मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात ४९,४७८ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीला मोठा पूर आला आहे.जायकवाडी धरणात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पाणीपातळी १५०८.९३ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६१३.४५६ दलघमी, तर जिवंत जलसाठा ८७५.३५० दलघमी एवढा झाला होता.