शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांमध्ये घुमले सनईचे सूर

By admin | Updated: June 2, 2014 00:49 IST

बीड : एसटीला रविवारी ६६ वर्ष पूर्ण झाली. एसटीच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बीड : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणार्‍या एसटीला रविवारी ६६ वर्ष पूर्ण झाली. एसटीच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात विविध कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे रविवारी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात सनईचे सुरांचा मंद आवाज प्रवाशांच्या कानावर पडत होता. बसस्थानकातील आकर्षक व स्वच्छ वातावरणामुळे बसस्थानके फुलून गेली होती. रविवारी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बीड बसस्थानकातही कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक, वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, आगार प्रमुख ए.यु.पठाण, भांडार अधिकारी चव्हाण, कुमार शिरशीकर, उपयंत्र अभियंता लांडगे, वाहतूक नियंत्रक एस.एन. महाजन, बाबा गर्कळ, एस.एच.कराड, स्थानकप्रमुख देशपांडे, बनसोडे, सत्तार भाई, नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक रेड्डी, नियंत्रक नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महामंडळातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आगारप्रमुख पठाण यांनी केले. यांचा झाला सत्कार इंधन बचत करणारे चालक एस.के. रणदीवे, जी.बी. तांदळे, एम.ए.शेख, जास्त उत्पन्न आणणारे वाहक आर. एम.घोडके, व्ही.एम.मगर, आय.के.शेख तर उत्कृष्ट अभियांत्रिकी म्हणून आर.व्ही.वंजारे, एन.पी.बारगजे, एच.डी.गल्लाळ यांचा अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बसस्थानकांचे रूपडेच बदलले एरवी घाण दिसणारे बसस्थानके रविवारी स्वच्छ व आकर्षक दिसून आली. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर केळीचे व फुलांचे तोरण बांधण्यात आले होते. आलेल्या प्रवाशांचे फुल देऊन सत्कार करण्यात आले. तसेच स्थानकांच्या दारावर रांगोळी काढल्याने हे अधिकच आकर्षक दिसत होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. स्थानकात येताच सनईचे सूर ऐकावयास मिळाले.