शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुकटछाप चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:17 IST

शहराच्या चौका-चौकांत आपणास दादा-भाऊंचे मोठमोठे होर्डिंग, बॅनर नजरेस पडत आहेत. वाढदिवस एकाचा व त्याच्या आजूबाजूला दहा- पंधरा जणांचे फोटोे असलेल्या या होर्डिंगने पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. कारण महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे. म्हणून फुकटछाप चमकोगिरी जोमात सुरू झाली आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या चौका-चौकांत आपणास दादा-भाऊंचे मोठमोठे होर्डिंग, बॅनर नजरेस पडत आहेत. वाढदिवस एकाचा व त्याच्या आजूबाजूला दहा- पंधरा जणांचे फोटोे असलेल्या या होर्डिंगने पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. कारण महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला आहे. म्हणून फुकटछाप चमकोगिरी जोमात सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक शहरातील वॉर्डांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच महानगरपालिकेने स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र, दुसरीकडे मोठमोठे होर्डिंग व बॅनर लावून शहराच्या विद्रुपीकरणाचा जणू विडाच स्वयंघोषित ‘दादा-भाऊं’नी उचलला आहे. शहरातील बहुतांश चौकांत, दुभाजकांवर उभे, आडवे डिजिटल बॅनर सर्वांच्या नजरेस पडत आहेत. गल्ली-बोळातील दादा-भाऊला शुभेच्छा देण्यासाठी शहरांचे विद्रुपीकरण केले जात आहे. सिडकोतील कॅनॉट गार्डन, आविष्कार कॉलनी चौक असो, एन-७ असो, टीव्ही सेंटर, हडको परिसर, आकाशवाणी चौक, छावणीतील चौक, रेल्वेस्टेशन रोड, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक, जालना रोड, औरंगपुरा, कुठेही जा जिकडे तिकडे अवैधरीत्या लावण्यात आलेले शेकडो होर्डिंग दिसून येत आहेत. शहराचे विद्रुपीकरण करणाºया अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी न्यायालयाने मध्यंतरीच्या काळात कारवाईचे आदेश दिले होते. मागील वर्षात मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई सुरू केल्याने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग, बॅनर गायब झाले होते, पण पथकाला न्यायालयाच्या आदेशाचा विसर पडला. होर्डिंग लावणारे कोणत्या ना कोणत्या पक्षांशी जोडल्या गेले असल्याने ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ अशी स्थिती आता मनपाची झाली आहे. सर्वप्रथम चौकाचौकांतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर काढा, मग शहर स्वच्छता अभियान मोहीम हाती घ्या, असे खडे बोल व्यक्त होत आहेत.अनधिकृतरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुपीकरण करणाºयांवर कारवाई करा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष क रून शहरात शेकडो अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. या विद्रुपीकरणासंदर्भात जागृती मंचच्या वतीने यापूर्वीच जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आता न्यायालयाचा अवमान केल्यामुळे चमकोगिरी करणाºया दादा-भाऊंवर खटला दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहे.जागृती मंचच्या अध्यक्षा भारती भांडेकर यांनी सांगितले की, महानगरपालिका कारवाई करीत नसल्याने शहरात पुन्हा चमकोगिरी करणाºयांनी जागोजागी होर्डिंग लावून शहर विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली आहे. म्हणून आता शासनाने ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या धर्तीवर ‘विद्रुपीकरण अ‍ॅप’ सुरू करावे. राज्यात जिथे जिथे अवैधरीत्या होर्डिंग लावण्यात आले असतील, सोहळे पार पडूनही वर्षानुवर्षे ते होर्डिंग एकाच जागेवर असतील, असे शहर विद्रुपीकरण करणाºयांचे फोटो नागरिकांनी त्या ‘विद्रुपीकरण अ‍ॅप’ वर लोड करावे. त्याची दखल घेऊन शासनाने कारवाई करावी, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागृती मंचच्या वतीने देण्यात येणार आहे.