शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीकर नाट्यगृहाचे रुपडे पालटणार!

By admin | Updated: January 30, 2017 00:04 IST

जालना :आठवडभरात मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल

जालना : चांगल्या दर्जाचे नाट्यगृह नसल्याने साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ थंडावली आहे. ही उणिव दूर करण्यासाठी आगामी आठवडभरात मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी उर्मी प्रतिष्ठाच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी दिली.उर्मी प्रतिष्ठाणच्या वतीने नूतन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील थंडावलेली साहित्यिक व सांस्कृतिक गतिमान करण्यासाठी पालिकेतर्फे योगदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाला आलेली अवकळा दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले. कुठल्याही भागातील समाजाची प्रगल्भता ही त्या त्या भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतून अधोरेखित होत असते. तसेच साहित्य व सांस्कृतिक भरणा पोषणातून मानवी जीवन अधिक समृद्ध होत असते. मानवी जिवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी विकासात याचे अमूल्य योगदान ठरते. मानवी अभिरुची जपणे आणि ते अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक या दोन्ही चळवळी थंडावल्या होत्या. यासाठी पुढाकार घेत उर्मी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर, सचिव संजय कायंदे, प्रा. डॉ. नारायण बोराडे, राजाराम जाधव, कविता नरवडे, प्रा. गौतम जगताप, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, प्रा. दिनेश सन्याशी यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे साकडे घातले. यावर सकारात्मकता दर्शवत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.