बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत अखेर पर्यंत महायुतीची चलती राहिली. महायुतीच्या पॅनलमधील ११ उमेदवारांचा विजय झाला तर सेवा सोसायटीमध्ये आ. अमरसिहं पंडित यांच्या गटाचे दोन तर माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या गटाचा एक असा तीन राष्ट्रवादी काँगे्रसच्या गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. पालकमंत्री पंकजा पालवे व राष्ट्रवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर व माजी आ. सुरेश धस यांच्यात युती झाल्याने महायुती झाली. त्यामुळे पाच उमेदवार बिनविरोध आले होता. आता महायुतीचे १६ तर राष्ट्रवादी गटाच्या ३ उमेदवार यांचे संचालक मंडळ तयार झाले आहे.बीड शहरातील शासकीय मजुर सोसायटी संघाच्या कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी चार वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी शक्यता होती मात्र मतमोजणी प्रक्रीया गतीने झाल्याने सकाळी आकराच्या सुमारास सर्व निकाल जाहीर झाले. एक-एक करत सर्व वर्गातील निकाल जाहीर झाल्याने बीड शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी एकच जल्लोश करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फारशा जागा जिंकता आल्या नाहीत. आ. पंडित व माजी आ. सोळंके यांच्या उमेदवारांचा विजय झाला मात्र विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा एकही उमेदवार निवडणून आला नाही. जिल्हा मध्यवर्ती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँगे्रस शक्तिनिशी निवडणूक रिंगणात नसल्याने शेवटी महायुतीचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून व्ही.एस. जगदाळे यांनी काम पाहिले. वैद्यनाथ लोकविकासपॅनलचे विजयी उमेदवारपरळी तालुका सेवा सहकारी मतदार संघातून नितीन जिवराज ढाकणे यांचा विजय झाला. ढाकणे यांना ३० मते तर बालासाहेब गणपत सोळंके यांना २० तर संजय पंडितराव दौंड यांना २ मते मिळाली. वडवणी तालुका सेवा सहकारी मतदार संघातून महायुतीचे फुलचंद राजाभाऊ मुंडे यांनी विजय मिळविला. मुंडे यांना १६ तर संदीपान गणपतराव खळगे यांना ७ मते मिळाली.अंबाजोगाई तालुका सेवा सहकारी मतदार संघातून महायुतीचे दत्तात्रय ज्ञानोबा पवार (पाटील) यांनी विजय मिळविला. पवार यांना २७ तर अप्पासाहेब बाळासाहेब चव्हाण यांना २४ मते मिळाली. महिला प्रतिनिधी मतदार संघातून महायुतीच्या संगीता सुरेश धस व मीनाबाई मार्तंडराव राडकर यांनी विजय मिळविला. धस यांना ८७९, राडकर यांना ७७५ तर अफसाना बेगम स.फताउल्ला यांना २६८ व संध्या आसाराम मराठे यांना २६८ मते मिळाली. इतर मागासवर्गीय मतदार संघातून महायुतीचे दिनेश जगन्नाथ परदेशी यांचा विजय झाला. परदेशी यांना ९१४ तर जगन्नाथ विठ्ठल काळे यांना ३११ मते मिळाली. नागरी सहकारी बँक, पतसंस्था मतदार संघातून महायुतीचे आदित्य सुभाष सारडा यांचा विजय झाला. सारडा यांना ७१, दीपक दत्तात्रय घुमरे यांना ४२ तर बाजीराव नंदकुमार मोराळे यांना ० मते मिळाली. अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून महायुतीचे परमेश्वर नागोराव उजगरे यांचा विजय झाला. उजगरे यांना ९११, ज्ञानेश्वर लक्ष्मणराव कांबळे यांना २५, विठ्ठल विश्वनाथ जोगदंड यांना ५ तर अशोक बाबासाहेब पावनपल्ले यांना २६७ मते मिळाली.विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून महायुतीचे उमेदवार सर्जेराव भगवानराव तांदळे यांचा विजय झाला. तांदळे यांना ९१७, चंद्रकांत बाबुराव चाटे यांना ३०१, महादेव तुकाराम तोंडे यांना ३ तर दिलीप बळीराम राठोड यांना ३ मते मिळाली.इतर शेती संस्था मतदार संघातून महायुतीचे उमेदवार महादेव तुकाराम तोंडे यांचा विजय झाला. तोंडे यांना ३७१, जगदीश किसनराव पोपळे यांना ६४, वसंत आसाराम सानप यांना ५ तर बाबुराव तुकाराम काकडे यांना ५ अशी मते मिळाली. बँक बचाव पॅनलचे विजयी उमेदवारगेवराई प्रक्रीया, प्राथमिक कृषी पत पुरवठा यात कैलास बाबासाहेब नलावडे यांचा विजय झाला. त्यांना ८३ मते मिळाली तर संतोष प्रकाशराव सुरवसे यांना ९ मते मिळाली.माजलगाव सेवा सोसायटी मतदार संघातून चंद्रकांत प्रकाशराव शेजुळ यांनी २४ मते मिळवत विजय प्राप्त केला तर महायुतीचे दत्तात्रय ज्ञानोबा वाळसकर यांना १६ मते मिळाली. कृषी पणन संस्था मतदार संघातून भाऊसाहेब कचरु नाटकर यांनी विजय मिळविला. नाटकर यांना ३६ तर वसंत आसाराम सानप यांना २८ तर रामदास सुर्यभान खाडे यांना १ मत मिळाले. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा
By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST