पडेगाव परिसरातील व्हिओंम मोबाईल कंपनीच्या मोबाईल टॉवरचे २,३७,६५४ रूपये कर थकीत असल्याने एक टॉवर सील करण्यात आला. रिलायन्स जिओ कंपनीकडे टॉवरच्या कराचे ४८,९८७ रूपये थकीत असल्याने ३ टॉवर्स, तर इंडस् कंपनीकडे ७,७५,९०१ रूपये थकीत असल्याने एक असे एकूण ५ मोबाईल टॉवर पालिकेच्या प्रभाग एकच्या पथकाने मंगळवारी सील केले. वाॅर्ड अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकचे कनिष्ठ अभियंता काकनाटे, वसुली पथकप्रमुख अविनाश मद्दी, एस.डी. कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.
जाधववाडी येथे ३८ जणांची कोरोना चाचणी
औरंगाबाद : जाधववाडी भाजी मंडई येथे भाजीपाला, फळ खरेदीसाठी येणारे नागरिक, व्यापारी यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी ३० जणांची तपासणी करण्यात आली. सोमवारी ज्या नागरिकांची तपासणी केली होती त्यातील एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.