शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार शिक्षक बदलीसाठी पात्र

By admin | Updated: June 9, 2017 01:05 IST

औरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले असून, अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदली हक्क प्राप्त शिक्षक समजण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा बदलीपात्र आणि बदली हक्क प्राप्त शिक्षकांची यादी आज गुरुवारी शिक्षण विभागाने जि. प. कन्या शाळेच्या दर्शनी भागात डकवली आहे. या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले असून, चार दिवसांत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यंदा सोपे आणि अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या असून, सोप्या क्षेत्रात सलग दहा वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले, तर अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी प्रथम प्राधान्य अर्थात बदली हक्क प्राप्त शिक्षक संबोधण्यात आले आहे. यास विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आक्षेप घेतले असून, सध्या खंडपीठाने आहे ती परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करा; पण पदस्थापना देऊ नका, असेही आदेशात खंडपीठाने म्हटले आहे. त्यानुसार शासनाने शिक्षण विभागाला सूचना दिल्या. त्या सूचनानुसार शिक्षण विभागाने सोप्या क्षेत्रात कुठेही अथवा कोणत्याही शाळेत सलग दहा वर्षांची सेवा करणारे शिक्षक तसेच सलग तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा करणाऱ्या शिक्षकांचा यादीत समावेश केलेला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व उपशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सांगितले की, यादी शिक्षकांच्या अवलोकनार्थ जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर डकवण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार बदलीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली जाणार आहे.