शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

दुधाळ जनावरे, शेळ्या मेंढ्यांसाठी पाच हजार अर्ज

By admin | Updated: September 28, 2016 00:47 IST

औरंगाबाद : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या मिळविण्यासाठी जिल्हाभरातील तब्बल सव्वापाच हजार लोकांनी अर्ज दाखल केले आहेत.

औरंगाबाद : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या मिळविण्यासाठी जिल्हाभरातील तब्बल सव्वापाच हजार लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांच्या छाननीनंतर लॉटरी पद्धतीने चिठ्ठ्या काढून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.पशुसंवर्धन खात्यातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नावीन्यपूर्ण ही वैयक्तिक लाभाची योजना राबविली जाते. यामध्ये लाभार्थ्यांना दुधाळ संकरित गायी, म्हशी तसेच शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप केले जाते. शिवाय शेडच्या बांधकामासाठी ठराविक अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, आदिवासी जमाती संवर्गांसाठी ही योजना लागू आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किमतीच्या ५० टक्के अनुदान तर अनुसूचित जाती, आदिवासी जमातीसाठी प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के इतके अनुदान देय आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने प्रयत्नशील असतात. यंदाही जिल्ह्यात या योजनेअंतर्गत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. गायी म्हशींच्या गटांत १६४९ आणि शेळी मेंढीच्या गटात ३५८२ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची छाननी करण्यात येत आहे. छाननीनंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. साधारणत: दिवाळीआधी हा ड्रॉ काढण्यात येईल.