शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाच यात्रेकरूंचा संपर्क होईना !

By admin | Updated: May 22, 2017 00:04 IST

लातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील २१ यात्रेकरू अडकले होते. त्यातील १६ यात्रेकरूंशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याचे सांगितले. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत उदगीरच्या पाच यात्रेकरूंचा संपर्क झाला नाही. या यात्रेकरूंचा संपर्क साधण्यासाठी नातेवाईकांबरोबरच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाले होते. उत्तराखंड यात्रेसाठी जिल्ह्यातील १६ यात्रेकरू गेल्याचे जिल्हा प्रशासनास नातेवाईकांनी कळविले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उदगीर येथील एका नातेवाईकाने आमचेही पाचजण याच यात्रेसाठी गेल्याचे कळविले. या यात्रेसाठी गेलेल्या चिमाचीवाडी येथील मीनाबाई गुरमे, पेठेवाडी येथील सुभाष पेठे, चंद्रकलाबाई पेठे, रामकिशन बंडगर, दैवशाला बंडगर, ज्ञानोबा पेठे, मंगलबाई पेठे, राधाबाई सुवर्णकार, खरबवाडी येथील लिंबाबाई धनासुरे, चवणहिप्परगा येथील लिंबराज बिराजदार, नागतीर्थवाडी येथील गणपती गरुडे यांच्याशी शनिवारी पहाटे संपर्क झाला. त्यांनी आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.