शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारा

By admin | Updated: November 3, 2016 01:35 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून,

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून, शहरात वेगवेगळ्या भागांत त्वरित पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यात यावीत, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिले. नवीन केंद्रे उभारण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या आगीत १२ कोटींहून अधिक मालमत्ता खाक झाली. शासनस्तरावर मनपाला प्रचंड मोठ्या प्रमाणात नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. आग लागल्यानंतर मनपाला किमान पाच ते दहा दुकाने तरी वाचविता आली असती तर मोठे यश असते. मनपाच्या अग्निशमन दलाला एकही दुकान वाचविण्यात यश आले नाही. अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार लक्षात घेऊन आयुक्त बकोरिया यांनी तीन दिवसांपूर्वीच अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित केले. अग्निशामक यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वीच मनपाला ५ नवीन अग्निशमन केंद्रे उभारा असे आदेश दिले. शहरात पाच ठिकाणी अग्निशमन केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटींचा निधी अपेक्षित असून, या कामासाठी लवकरच निविदा मागविल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली. ते म्हणाले, नगरविकास विभागाकडून शहरात अग्निशमन यंत्रणा गतिमान करण्यासाठी ५ नवीन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. अग्निशमन विभागाने ५५ पदांची गरज असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ५५ पैकी २६ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशामक, अग्निशामक, वाहनचालक आणि आॅपरेटर, अशी पदे आहेत. शासन निर्णयानुसार शहरात आपत्ती व्यवस्थापन केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले.