शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत २५ महिलांना दिले घरातून हाकलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

औरंगाबाद : मागील ५ महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांतील २५ महिलांना त्यांच्या पतीने घरातून हाकलून दिले, तर अन्यायाला वाचा ...

औरंगाबाद : मागील ५ महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांतील २५ महिलांना त्यांच्या पतीने घरातून हाकलून दिले, तर अन्यायाला वाचा फोडल्याने १३० महिलांवर घरातच अत्याचार होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

स्त्री शिक्षित झाली, पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करू लागली, असे भाषणात अभिमानाने आपण सांगत असतो; पण वास्तव्य दाहक आहे. याची प्रचीती कौटुंबिक हिंसाचार झालेल्या १३० महिलांच्या तक्रारीतून आली. अशा पीडित महिलांना सखी वन स्टॉप सेंटरने आधार दिला. तेव्हा ही आकडेवारी समोर आली. सासू-सुनेमधील भांडण काही नवीन नाही; पण त्यात पती मध्ये पडतो व आपल्या आईचा अपमान का केला म्हणून पत्नीला जबर मारहाण करतो, अशा ७० टक्के केसेस आहेत.

मोबाईलवर जास्त वेळ कोणाशी बोलते यावर संशय घेऊन पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या ५ टक्के केसेस, तर ३ टक्के केसेसमध्ये माहेरचे विशेषत: आईची आपल्या मुलीच्या संसारात लुडबूड अत्याचाराचे कारण बनल्याचे दिसून आले. ४ ते ५ टक्के केसेस अशा आहेत की, त्यात पीडित महिलेची चुकी असल्याचे आढळून आले.

घरातून हाकलून दिलेल्या २५ महिलांना वन स्टॉप सेंटर येथेच तात्पुरती निवासाची व्यवस्था करून देण्यात आली. १८ महिलांना वैद्यकीय, तर ५२ महिलांना पोलीस विभागाची मदत, १४ महिलांना कायदेशीर मदत मिळवून देण्यात आली आहे. १३० पैकी १०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. २० महिला ज्याच्यासाठी सासरचे दरवाजे बंद होते त्या महिलांना तिच्या सासरच्यांनी पुन्हा घरात घेतले व आज आनंदात संसार करीत आहेत. हेच सखी वन स्टॉप सेंटरचे यश असल्याचे केंद्र संचालिका ममता मोरे यांनी सांगितले.

चौकट

पीडित महिलेला मोफत मदत

पीडित महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचारानंतर या विविध विभागांकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता त्या महिलेची उरलेली नसते. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने कटकटगेट परिसरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रालगत सखी वन स्टॉप सेंटरला परवानगी दिली आहे. येथे पीडित महिलांना मोफत मदत केली जात आहे.