उदगीर : शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीतून झालेल्या वादातून फसवणूक झाल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात तिघाविरू द्ध गुन्हा नोंद आहे़उदगीरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांची फसवणुक झाली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसात अब्दुल समद मकबुल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महम्मद आयुब शेख, इमरान शेख आणि रहीम पटेल यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद आहे़
प्लॉटच्या खरेदी व्यवहारात पाच लाखाला गंडविले
By admin | Updated: December 29, 2016 22:59 IST