परळी : गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वर्षभरापूर्वी फरार झालेल्या आरोपीला येथील पोलिसांनी बुधवारी अटक केली़इस्माईल सुदान (रा़ दाउतपूर, परळी) असे आरोपीचे नाव आहे़ २०१३ मध्ये त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळले होते़ या प्रकरणात शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ त्याला न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़तडीपारी डावलणारा पकडलाचार जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार केलेल्या लक्ष्मण गंगाधर गवारे याला परळीमध्ये बुधवारी पकडले़ त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ (वार्ताहर)
पिस्तूल प्रकरणातील फरारी जाळ्यात
By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST