शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पहिला शब्द शपथेचा... पहिली घोषणा ‘पोल घ्या... पोल घ्या...’

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

आमदार त्रिंबक भिसे , लातूर पहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो.

आमदार त्रिंबक भिसे , लातूरपहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो. थोडीशी धाकधूकही होती. पण वातावरण इतके हलकेफुलके होते की दडपणे गळून पडली. मी आमदार म्हणून उच्चारलेला पहिला शब्द शपथेचा आहे. कारण ती शपथ आमदार म्हणून देण्यात येत होती. तर माझी पहिली घोषणा ‘पोल घ्या.. पोल घ्या...’ ही. अधिवेशनाच्या तारखा घोषित झाल्यावर मुंबईचे वेध होतेच. काही घरगुती कारणामुळे कुटुंबही सोबत घेतले. परंतु मंत्रालयातीलच कर्मचारी पंडीतराव सर्जे आणि रमेश पारीख हे खास माझ्यासोबत सहकारी आले. मी जिल्हा परिषदेला तीन टर्म सदस्य होतो. या आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने त्यांना भेटायला म्हणून याआधी विधानभवनात गेलो होतो. पण आमदार म्हणून पाऊल टाकताना आनंदच और होता. आमदार निवासात एका मतदारसंघातून यापूर्वी जो आमदार निवडून आला त्याच आमदाराचे निवासस्थान पुढच्याला देतात. त्यामुळे माझे मित्र वैजनाथराव शिंदे यांचेच निवासस्थान मला मिळाले. दहा तारखेला सकाळी लवकर आवरुन मी विधानभवातील पक्ष कार्यालयात बैठकीला गेलो. तिथे मला माझ्या नावाची फाईल मिळाली. त्या फाईलमध्ये जी कागदपत्रे होती त्यात सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी, माझ्यासाठी जी खुर्ची होती तिचा क्रमांक आणि इतर नव्या आमदाराला उपयोगी ठरतील अशा माहितीची कागदे होती. कागदपत्रे घेऊन ज्या सभागृहासाठी मी निवडून आलो त्या विधानभवनात पहिल्यांदा पाऊल टाकले होते. यापूर्वी कधीच मी तिथे गॅलरीत बसायलाही गेलो नव्हतो. आत जाताच छाती भरुन आली. २८१ क्रमांकाची खुर्ची माझ्यासाठी रिझर्व्ह होती. त्यात जाऊन बसलो. माझ्या एका बाजूला आ. नितेश राणे आणि एका बाजूला आ. कुणाल पाटील होते. आ. यशोमती ठाकूर आणि आ. वर्षा गायकवाड पुढे मागे. सभागृहात १३० आमदार नवीन होते. त्यात आमच्या काँग्रेसचे ४२. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींच्या भेटी घेतल्या. मी लातूर ग्रामीणमधून निवडून आलोय हे कळल्यावर अनेकांनी विलासराव देशमुख यांची तीव्रतेने आठवण काढली. पहिल्या दिवशी गावीत यांची हंगामी सभापती आणि बाळासाहेब थोरात यांची हंगामी उपसभापती म्हणून निवड झाली होती. नव्या आमदारांचा शपथ देण्याचेच पहिल्या दिवशी कामकाज चालले. ११ ते २ हा संपूर्ण दिवस मी सभागृहात बसलो. आमदारांची शपथ झाली की सर्वजण टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे. दुपारी कामकाजानंतरच मी बाहेर आलो. दुसऱ्या दिवशीही आमदारांचे शपथविधी झाले. मराठीतून ‘मी त्रिंबक भिसे ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेतो की’ म्हणत तत्कालीन उपसभापती बाळासाहेब थोरात यांच्याकडून आमदारकीची शपथ घेतली. खुप हरखून गेलो होतो. सर्व नव्या-जुन्या आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. ओळखी करुन घेतल्या. सभागृह समजून घेण्याचा प्रयत्न केला. लॉबीत माझ्या नावाचे कपाट होते. त्यात फाईल ठेवली - काढली. मनापासून भाषणे ऐकली. आ. आर. आर. पाटील, आ. गणपतराव देशमुख यांची भाषणे खुप आवडली. सभागृहातील तिसरा दिवस हा गोंधळाचाच होता. सभापतींच्या निवडीनंतर अविश्वास दर्शक ठरावावरुन प्रचंड घोषणाबाजी झाली. यावेळी काँग्रेसचे सारे आमदार ‘पोल घ्या.. पोल घ्या..’ ही घोषणा देत होते. मी ही उठून त्यात सहभागी झालो आणि जोरात घोषणा दिल्या. हा दिवसच गोंधळाचा होता. तरीही सत्ताधाऱ्यांनी आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. आमचे नेते सभापतींच्या दालनात जाऊन हरिभाऊ बागडे आणि मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पोलची मागणी करीत होते त्यात मी सुध्दा सहभागी झालो. आमच्या नेत्यांसोबत आम्ही राज्यपाल यायच्या प्रवेशद्वारासमोर बसून निदर्शने केली.