शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ५४ सदस्य करणार पहिल्यांदाच एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:51 IST

लातूर लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी नवा इतिहासच घडला़ त्याचबरोबर ५८ पैकी ५४ उमेदवार हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवत आहेत़

हरी मोकाशे लातूरलातूर जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी नवा इतिहासच घडला़ त्याचबरोबर ५८ पैकी ५४ उमेदवार हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवत आहेत़ त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे़ आता जिल्हा परिषदेचा कारभार नवख्यांच्या हाती येणार आहे़जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे़ भाजपाने ३६ जागा मिळविल्या आहेत़ काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे़ शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे़ सत्ता मिळविणाऱ्या भाजपाने या निवडणुकीत नवी रणनिती आखून नवख्यांना संधी दिली आणि त्याचा अपेक्षित लाभही झाला आहे़ जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते रामचंद्र तिरूके आणि मदनसुरी गटातील भाजपाचे संतोष वाघमारे यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत संधी मिळाली आहे़ त्याच बरोबर काँग्रेसचे उजनी गटातील नारायण लोखंडे आणि राष्ट्रवादीच्या तोगरी गटातील आशा पाटील यांनाही जिल्हा परिषदेची दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे़ भाजपच्या भारतबाई सोळंके, अरूणा बरमदे, संजय दोरवे, धोंडिराम बिरादार, कुसूम हालसे, मिलिंद लातूरे, बजरंग जाधव, गोविंद चिलकुरे, राजीव कांबळे, कल्पना कांबळे, दैवशाला कोलपाक, महेश पाटील, सुरेश लहाने, सुरेंद्र गोडभरले, संगीता घुले, रोहिदास वाघमारे, अरूणा कांबळे, विमल पाटील, सुधाकर श्रृंगारे, धनश्री अर्जुने, प्रिती शिंदे, अरूणा शिंगडे, मनिषा वाघमारे, अशोक केंद्रे, प्रकाश देशमुख, मुद्रिका भिकाणे, मधुबाला कांबळवाड, विजया बिराजदार, ज्योती राठोड, राहूल केंद्रे, उषा रोडगे, बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील, पृथ्वीराज शिवशिवे हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत पाऊल ठेवित आहेत़ काँग्रेसचे धीरज देशमुख, धनंजय देशमुख, रूक्मीणबाई जाधव, कोमलबाई धुमाळ, संगीता शिंदे, शालिनी चव्हाण, संतोष तिडके, उद्धव चेपट, शोभा ढमाले, साधना जाधव, परमेश्वर वाघमारे, सोनाली थोरमोटे, शीना ढगे, शितल पाटील यांची जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एन्ट्री होत आहे़ राष्ट्रवादीचे सुभाष पवार, दिलीप नाडे, मंचकराव पाटील, माधव जाधव या चौघांसह शिवसेनेच्या संगीता माने आणि अपक्ष अनिता परगे हे ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचा कारभार अनुभवणार आहेत़ सर्व सदस्यांना आता सभागृहाची उत्सुकता लागली आहे़