जालना : राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त जालन्यात पहिल्यांदाच व्याख्यान मालेचे आयोजन २६ मे रोजी करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गाढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजे यशवंतराव होळकर बचतगट, जिल्हा आरक्षण कृति समिती, अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समिती, सम्राट अशोक जन्मोत्सव समिती व महाराणी अहिल्याबाई प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. २१ मे ते ५ जून दरम्यान जन्मोत्सव पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. तसेच २६ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर व्याख्यान मालेत वक्ते सौरभ हटकर (बुलडाणा) हे होळकर ‘शाहीचा जाज्वल इतिहास तथा पुरोगामी विचारांचा वारसा’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. उद्घाटक म्हणून पणन महासंघाचे संचालक डॉ. सुभाष माने हे राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहाय्यक संघटनेच्या प्रतिनिधीी अंजना सोनवलकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र गाडेकर हे राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी उत्सव समितीचे सचिव शांतीलाल बनसोडे, उपाध्यक्ष दीपक दहेकर, प्रा. पंडित लव्हटे, प्रा. कैलास कोळेकर, रामेश्वर आधे, अॅड. अशोक तारडे, प्रा. बी. जी. श्रीरामे, श्रीराम कडेवार, अरूण धोत्रे, ए.एस. गायकवाड, बाबासाहेब मिसाळ, राजेश शिंगाडे, प्रा. लहु दरगुडे, नारायण पाझडे, अरूण पितळे, आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जन्मभूमी चौडी जि. अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून एक लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे डॉ. राजेंद्र गाढेकर यांनी यावेळी सांगितले.४ प्रज्ञावान समाज निर्माण व्हावा, यासाठी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून या वर्षीपासून राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर व्याख्यानमाला पहिल्यांदाच सुरू करण्यात आली असून यापुढे ती अखंडपणे सुरू ठेवण्याचा मानस प्रा. पंडित लव्हटे यांनी व्यक्त केला.
पहिल्यांदाच अहिल्याबाई होळकर व्याख्यानमाला
By admin | Updated: May 21, 2015 00:27 IST