शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात चव्हाण गटाकडे ३७ पैकी २७ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:22 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आ. सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचे विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेतलेल्या ५ जागांची पुनर्मतमोजणी करत विजयी उमेदवारांना सायंकाळी उशिरा प्रमाणपत्र प्रदान केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आ. सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचे विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेतलेल्या ५ जागांची पुनर्मतमोजणी करत विजयी उमेदवारांना सायंकाळी उशिरा प्रमाणपत्र प्रदान केले.विद्यापीठ अधिसभेच्या २९ आणि विद्यापरिषदेच्या ८ जागांची मतमोजणी दोन दिवसांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पूर्ण झाली आहे. यात पदवीधरचे आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलला अधिसभेत २० आणि विद्यापरिषदेच्या ७ जागा जिंकल्या आहेत. यातील महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील आरक्षित पाच जागांचे निकाल राखीव ठेवले होते. विद्यापरिषदेची मतमोजणी झाल्यानंतर राखीव ठेवलेल्या आरक्षित जागेचे पुनर्मतमोजणी करत सर्व विजयी उमेदवारांना रात्री उशिरा प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती विजयी उमेदवार डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी दिली. विद्यापीठ विकास मंचचा प्राचार्य गटात चार, प्राध्यापकात दोन आणि विद्या परिषदेत एक उमेदवार विजयी झाला आहे.कोणतेही कारण नसताना रात्री गोंधळमतमोजणी कक्षात बसविण्यात आलेला टेबल तुटल्यामुळे काही मतपत्रिका बाजूला ठेवल्या होत्या. यात एका केंद्राच्या ८३ मतपत्रिकांचा समावेश होता. आरक्षित प्रवर्गातील जागांमध्ये दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत असल्यामुळे या मतपत्रिकांचा आकडा जुळवला नाही. त्याकडे दोन्ही गटांच्या उमेदवारांनीही लक्ष वेधले नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकूण मतपत्रिकांमध्ये ८३ मतपत्रिका कमी भरत असल्याचे लक्षात आले. तेव्हा शोधाशोध केली असता, एका मतपेटीत ८३ मते सापडली. त्यात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिकाही होत्या. मात्र आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी पूर्ण झाली होती. तेव्हाच एका गटाच्या उमेदवारांनी मतमोजणी थांबवत मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली. ही मागणीच कायद्याला धरून नव्हती. यामुळे पोलीस संरक्षणात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिका सीलबंद केल्या असल्याचे डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी उशिरा आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना बोलावून पुनर्मतमोजणी करण्यात आली. मात्र या मतमोजणीकडे विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी पाठ फिरवली.पराभव झाल्यामुळे बेछूट आरोपविद्यापीठ विकास मंचने राज्य सरकार, केंद्र सरकारमधील असलेल्या सत्तेच्या जोरावर विजयी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, ते धुळीस मिळाल्यामुळे आ. सतीश चव्हाण यांच्यावर बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, आगामी पाच वर्षांत विद्यार्थी हिताचे निर्णय घेत विद्यापीठाला गतवैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले.