शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आमिरच्या ‘हरफनमौला’ गाण्याचा फर्स्ट लूक आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:02 IST

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि अभिनेत्री एली अवरामच्या डान्स व्हिडिओची पहिली झलक समोर आली आहे. एली अवरामने इन्स्टाग्रामवर नव्या ...

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि अभिनेत्री एली अवरामच्या डान्स व्हिडिओची पहिली झलक समोर आली आहे. एली अवरामने इन्स्टाग्रामवर नव्या गाण्यातील लूक शेअर केला आहे, ज्यात आमिरसोबत एका वेगळ्या स्टाइलमध्ये दिसते आहे. फोटोमध्ये एली आणि आमिर खान रोमँटिक स्टाइलमध्ये दिसतायेत. विशेष म्हणजे, गाण्यासाठी आमिर खानने स्वतःचा लूक डिझाइन केला आहे. यापूर्वी गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ आला होता. यात आमिर खूप मस्तीच्या मूड दिसत होता. आमिर ‘लालसिंग चड्ढा’च्या शूटिंगमध्ये ब्रेक घेऊन जयपूरला या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी गेला होता.

जुही आणि आयशा करणार डिजिटल माध्यमात पदार्पण

‘हश हश’च्या निमित्ताने पुरस्कार विजेत्या अभिनेत्री जुही चावला आणि आयशा झुल्का डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहेत. त्यांच्याबरोबर या सिरीजमध्ये कृतिका कामरा, करिश्मा तन्ना, सोहा अली खान, शहाना गोस्वामी यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. ही कहाणी मूलत: स्त्रियांच्या नजरेतून उलगडणारी असून, स्वत:ची कहाणी सांगणाऱ्या महिलांच्या कथेतून अनेक पैलू उलगडत जाणार आहेत. ‘हश हश’साठी प्रोडक्शन डिझायनर, कॉस्च्युम डिझायनर, सुपरवायझिंग प्रोड्युसर, को-प्रोड्युसर्सपासून ते आर्ट, कॉस्च्युम, प्रोडक्शन कोऑर्डिनेशनपासून ते अगदी सिक्युरिटी टीमपर्यंत बहुतेक सर्व तांत्रिक कामेही स्त्रियाच सांभाळणार आहेत.

ग्लॅमरस फोटोशूटने श्रेया बुगडेने वेधले लक्ष

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे; पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे मिळाली. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने नुकतेच तिचे व्हाइट ड्रेसमधले फोटो शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. ‘काहीच सिद्ध करायचे नाही, मी जशी आहे तशी पुरेशी आहे’, असे कॅप्शन तिने यावर दिले आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत ‘समुद्र’ या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.