शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

महापौरांची पहिली सर्वसाधारण सभा

By admin | Updated: June 18, 2016 00:57 IST

लातूर : काल परवा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या बाकावर बसून महापौर, आयुक्तांना कैचित पकडणारे अ‍ॅड़दीपक सूळ आता महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत़

लातूर : काल परवा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या बाकावर बसून महापौर, आयुक्तांना कैचित पकडणारे अ‍ॅड़दीपक सूळ आता महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत़ त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेली पहिलीच सर्वसाधारण सभा शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात ११ वाजता होत आहे़ आता ते आपल्या सहकारी नगरसेवकांच्या कैचित सापडतात की, प्रत्युत्तर देऊन त्यांनाच कैचित धरतात हे आज सभागृहात पहायला मिळणार आहे़सर्वसाधारण सभेत एकूण मागील इतिवृत्तासह १९ विषय चर्चा व मान्यतेसाठी घेतले असून, विलासराव देशमुख यांचा नाना- नानी पार्क किंवा आजी आजोबा पार्कमध्ये पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या खर्चास मान्यता देणे हा विषय विषय पत्रिकेवर प्राधान्याने घेतला आहे़ शहराच्या विविध भागात मोठ्या नाल्यावर झाकण बसविणे, रस्ते करणे, वरंवटी खत प्रकल्पाच्या जागेवर बगीचा विकसीत करणे व संरक्षण भिंत बांधणे यावरही सभेत चर्चा होणार आहे़ सम्राट चौक ते गांधी चौक या रस्त्याचे २़१६ कोटी रुपयांचे अनुदान विविध चौकातील सुशोभिकरणासाठी वर्ग करणे, लातूर शहर हद्दीमध्ये महावीर स्तंभ उभा करण्यासाठी खर्चास मान्यता देणे, शहरातील ग्रीन बेल्ट विकसीत करणे, वरवंटी कचरा डेपो येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा मागविणे, नळांना मिटर बसविणे आदी विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे़ (प्रतिनिधी)