शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठस्तरावर देशातील पहिला डिजिटल स्टुडिओ

By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST

विजय सरवदे, औरंगाबाद देशातील नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उच्च व जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम

विजय सरवदे, औरंगाबाददेशातील नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उच्च व जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीचा वसा घेतला आहे. स्वतंत्र इमारतीमध्ये वृत्तपत्रविद्या विभागाचा साडेआठ कोटी रुपयांचा ‘डिजिटल स्टुडिओ’ आकाराला येत असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. या विभागाला २३ आॅगस्ट रोजी ४० वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर मल्टिमीडिया लॅबचे कामही पूर्ण झालेले आहे. विद्यापीठातील ‘डिजिटल लॅब व मल्टिमीडिया लॅब’विषयी वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, देशातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेने आपल्या विद्यापीठात जागतिक पातळीवरील सर्वोत्तम ‘डिजिटल लॅब’ उभारण्यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू झाले होते. वृत्तपत्र विभागात टेलिव्हिजन, रेडिओ, अ‍ॅनिमेशन, फिल्मचे संपादन करण्याची सुविधा असावी, हाय डेफिनेशन फिल्म तयार करता यावी, विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांमध्ये पानांची मांडणी कशी केली जाते, त्याचे संपादन, सजावट, जाहिरात मांडणी आदींचे कौशल्य शिकता यावे, यासाठी ‘मल्टिमीडिया लॅब व डिजिटल स्डुडिओची कल्पना पुढे आली. त्यादृष्टीने सन २००० मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. सोनवणे यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर सन २००६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक झाली.मल्टिमीडिया लॅबमध्ये सर्व अ‍ॅपल संगणक बसविण्यात आली आहेत. या लॅबमध्ये एकूण २६ संगणकांचा समावेश असून फिल्म एडिटिंग, टेलिव्हिजन एडिटिंग, रेडिओ एडिटिंग, अ‍ॅनिमेशन, न्यूज- इमेज अँड ग्राफिक्सच्या प्रात्यक्षिकांसाठी जगातील अत्याधुनिक लायन्सयुक्त प्रोफेशनल सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आलेली आहेत.४विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने प्रशिक्षित केलेले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. विशेष म्हणजे, या लॅबमध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची उच्चतम सुविधा निर्माण केली असून त्याद्वारे वृत्तपत्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जगातील ख्यातनाम प्राध्यापकांचे लाईव्ह व्याख्यान बघता व ऐकता येईल.