जालना : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शुक्रवार पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, आजचा पहिलाच दिवस निरंक ठरला. जिल्ह्यात ५६ गट आणि ११२ गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १५ दिवसांपासून राजकीय पक्षांच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, अद्यापपर्यंत एकाही राजकीय पक्षाने अधिकृतपणे आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. उमेदवार अर्ज भरण्यासाठी पाच दिवस मिळणार आहे. त्यातही पहिला दिवशी म्हणजे शुक्रवारी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यातच पहिल्याच दिवशी पौष अमावास्या आली. त्यामुळे उमेदवाऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे.
उमेदवारीचा पहिला दिवस निरंक
By admin | Updated: January 28, 2017 00:55 IST