शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या विरोधाचा पहिला दिवस मौनाचा

By admin | Updated: March 22, 2017 00:18 IST

लातूर जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा पहिला दिवस तसा मौनाचाच ठरला

आशपाक पठाण  लातूरजिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा पहिला दिवस तसा मौनाचाच ठरला. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारही दिला नाही. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी बिनविरोध आले. सभागृहात उशिरा आलेल्या काँग्रेस सदस्यांकडे ना प्रशासनाचे लक्ष गेले, ना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे. सभागृहात प्रवेश करताना काँग्रेस सदस्यांनी स्वत:हून नागरिकांना रस्ता सोडण्याची विनंती केली. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच बहुमतात आलेल्या भाजपाचा सत्ता स्थापनेचा आनंद ओसंडून वाहत होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. पोलीस आणि जिल्हा परिषदेतील काही कर्मचारीही उभे होते. येणाऱ्या सदस्यांना सभागृहात सोडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी भाजपाचे सदस्य सभागृहात जाताच इतरांकडे मात्र दुर्लक्ष केले. दुपारी २.५४ वाजता काँग्रेसचे सदस्य धीरज देशमुख, धनंजय देशमुख, सोनाली थोरमोटे आदीजण सभागृहात येत असताना प्रवेशद्वारात गर्दीत अडकले. जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला पहिल्याच दिवशी आलेला अनुभव जिव्हारी लागणारा आहे. ३.०५ वाजता आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दिलीप नाडे, मंचकराव पाटील आदींनाही स्वत:हून सभागृहात मार्ग काढीत जावे लागले.