लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जीएसटीचे कारण देत बिल देण्यास नकार दिला जात असल्याची जीएसटी संदर्भातील पहिलीच तक्रार राज्य कर अधीक्षकांकडे दाखल झाली आहे़ तालुक्यातील मांगणगाव येथील दत्तराव मुळे यांनी ही तक्रार दिली आहे़ त्यानुसार मुळे हे परभणीतील विसावा कॉर्नर भागातील एका व्यावसायिकाकडे फवारा पंप घेण्यासाठी गेले़ तेव्हा २५०० रुपये पंपाची किंमत सांगण्यात आली़ बिल मागितले असता, व्यापाऱ्याने बिल देण्यास नकार दिला़ जीएसटीमुळे भाववाढ झाली आहे़ बिल देता येणार नाही, असे सांगून लूट केली जात असल्याचे या तक्रारीत मुळे यांनी म्हटले आहे़
जीएसटीच्या विरोधात पहिली तक्रार दाखल
By admin | Updated: July 6, 2017 23:51 IST