शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतून प्रथमोपचार पेट्या झाल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:30 IST

प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाºया एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाºया एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला.सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसचा प्रवास निवडला जातो़ मात्र मागील काही वर्षांपासून एसटी प्रवाशांना मिळणाºया सुविधांकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ बसमधून प्रवास करीत असताना प्रकृती स्वास्थ्याविषयी काही प्रश्न निर्माण झाल्यास बस गाडीमध्ये प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे आगीसारख्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी अग्नीशमन यंत्रणा बसमध्ये ठेवलेली असते़ परंतु, मागील काही वर्षांपासून या सुविधांकडे महामंडळ कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे़या संदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी बसस्थानकावर जाऊन प्रत्यक्ष बस गाड्यांची पाहणी केली़ तेव्हा एकाही बसमध्ये प्रथमोपचार पेटी निदर्शनास आली नाही़ या पाहणी दरम्यान, १५ बसेची तपासणी करण्यात आली़ गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास या पाहणीला सुरुवात करण्यात आली़ परभणी बसस्थानकावर अकोला-धारूर ही बस उभी होती़ बसमध्ये चढून प्रथमोपचार पेटीचा शोध घेतला़ परंतु, पेटी मिळून आली नाही़ त्यानंतर या बसच्या शेजारीच असलेल्या परभणी-हिंगोली (एमएच २० बीएल- २३१८) या बसमध्येही प्रथमोपचार पेटी नसल्याचे दिसून आले़ विशेष म्हणजे, किमान लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये तरी प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध असेल, अशी अपेक्षा होती़ त्यामुळे औरंगाबाद-देगलूर या हायकोर्ट एक्सप्रेस नावाने चालविल्या जाणाºया बसची (क्रमांक एमएच २० बीएल-४०१४) पाहणी केली़ तेव्हा या बसमध्ये देखील प्रथमोपचार पेटी आढळली नाही़ परभणी-लातूर या (एमएच २० बीएल- ३७८८) बसमध्ये प्रथमोपचार पेटी होती़ परंतु, त्यात काहीही नव्हते़ तर रिसोड-सोलापूर या बसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेटीत चक्क डास मारण्याचे क्वॉईल ठेवले असल्याचे दिसून आले़ याच दरम्यान, परभणी-लातूर, परभणी-कुंभारी बसेसमध्येही प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले़ काही बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या आढळल्या़ परंतु, त्यात उपचाराची कुठलीही साधने नव्हती़ प्रवासी सेवेसाठी बस रस्त्यावर दाखल होताना या सर्व सुविधा दिल्या जातात़ परंतु, त्याची देखभाल होत नाही़ परिणामी काही ठिकाणी केवळ नावापुरते प्रथमोपचार बॉक्स ठेवले असल्याचेच पहावयास मिळाले़