शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:51 IST

मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लातूरला महाविद्यालयात असताना झालेला वाद सोमवारी उफाळून आला. मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली. यामध्ये दोन्ही गटाच्या दोन-दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ऋतूपर्ण नागरे (थेरला), अनिकेत राख (पाटोदा), ऋषीकेश खंदारे (बीड), संदीप दहिफळे (बीड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऋतूपर्ण नागरे व संदीप, ऋषीकेश हे तिघे लातूरला महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. यावेळी त्यांचे अज्ञात कारणावरुन वाद झाले होते. दोघांच्याही मनात खुन्नस होती. सोमवारी दुपारी अंकुशनगर भागातील एका चौकामध्ये ऋतूपर्ण नागरे हा एका जीपमधून ६ मुलांना घेऊन बीडमध्ये आला. यावेळी ऋषीकेश व संदीप गटाने आणखी मुलांना बोलावून घेतले. ऋषीकेशच्या गटात जास्त मुले जमली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारीत रुपांतर झाले. याचवेळी ऋतूपूर्ण नागरे गटाच्या रुपसिंग टाक (टाक हे फौजी होते, अशी प्राथमिक माहिती आहे) यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. संदीप व ऋषीकेशला तात्काळ ताब्यात घेतले तर ऋतूपर्ण व अनिकेतला पोलिसांनी चºहाटा, पिंपळवंडी, धुमाळवाडी या भागातील जंगलात पाठलाग करुन पकडले.गोळीबार झाला त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मुन्ना वाघ हे तेथून जात होते. त्यांनी आवाज ऐकताच धाव घेतली.त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता धूम ठोकली. यावेळी वाघ यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना माहिती दिली.जवळच असलेले संघर्ष गोरे यांनीही धाव घेत एकाला ताब्यात घेतले. या दोघांच्या सतर्कतेमुळेच गोळीबार करणारे पोलिसांच्या हाती लागले.