शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फटाका मार्केट अयोध्या मैदान आणि वाळूजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:39 IST

सुरक्षेच्या कारणास्तव शहरात केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदान आणि वाळूज परिसरातच फटाका मार्केटला शुक्रवारी परवानगी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुरक्षेच्या कारणास्तव शहरात केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदान आणि वाळूज परिसरातच फटाका मार्केटला शुक्रवारी परवानगी देण्यात आली. सिडको-हडको, मुकुंदवाडी आणि शिवाजीनगर येथील दुकानांच्या परवानगीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले.याविषयी अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाका मार्केटच्या परवानगीसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. गतवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करणाºया असोसिएशनला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त डॉ. विनायक ढाकणे यांना फटाका मार्केटसंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही अधिका-यांचे अहवाल पोलीस आयुक्तांना शुक्रवारी दुपारपर्यंत प्राप्त झाले नव्हते. पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, रहिवासी एरियात फटाक ा दुकानांना परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सध्यातरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदानावर आणि वाळूज एमआयडीसी परिसरातच फटाका मार्केटला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील दहा ठिकाणी दरवर्षी फटाका मार्केट सुरू होते. या दुकानांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दिवाळीला अवघे पाच दिवस उरले असताना फटाका मार्केटसंदर्भात निर्णय न झाल्याने व्यापारी हवालदिल झाले आहे. परवानगी न मिळाल्यास व्यापा-यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.