सिल्लोड : फटाक्यात वापरली जाणारी पावडरची वाहतुक करणाऱ्या माल ट्रकला आग लागुन दोन ट्रक जळून खाक झाले़ आगीत अन्य दोन ट्रकचेही नुकसान झाले़ ही घटना मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बाळापूर (ता.सिल्लोड) येथे घडली़एका हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली़ यामुळे जीवितहानी झाली नाही.कोटा (राजस्थान) येथून बंगळुरूकडे (कर्नाटक) फटाक्यासाठी वापरली जाणारी पावडर घेऊन जाणारा मालट्रक बाळापूरजवळ असलेल्या एका हॉटेलवर रात्री २.३० आला़ तेथे थांबलेल्या मालट्रकच्या शेजारी चालकाने मालट्रक उभा केला. मात्र काही वेळातच अचानक मालट्रकने (क्ऱ आरजे-२० जीबी-०७९५) पेट घेतला़ क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले़ काही क्षणात बाजूला उभ्या असलेल्या आरजे-२०़ जीबी-६१९५, आरजे-२० जी़ऐ-५५२६), एमपी-०९ एचएफ ४०१२) या ट्रकलासुद्धा या आगीची झळ पोहोचली़
आग लागून दोन मालट्रक भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:14 IST