शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कंधार-लोह्यातील पुढार्‍यांची अग्नीपरीक्षा

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़

गंगाधर तोगरे , कंधार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ़ सुनील गायकवाड यांना विक्रमी मताधिक्य लोहा विधानसभा मतदारसंघात मिळाले़ त्यामुळे काँग्रेस-राकाँमधील मातब्बर पुढार्‍यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे़ परंतु भाजपाला आशेची पालवी फुटेल असा उत्साह संचारला आहे़ उमेदवारीचे अडथळे पार करून कोण बाजी मारणार यावर राजकीय चर्र्चेने उधाण आणले आहे़ कंधार-लोहा हा तसा विरोधी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो़ भाई केशवराव धोंडगे यांनी या भागाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले़ तरीही गावपातळीपर्यंत काँग्रेस मजबूत स्थितीत राहत आली़ काँग्रेसचे कैग़ोविंदराव मोरे व ईश्वरराव भोसीकर यांना विधानसभेची संधी मिळाली होती़ गुरुनाथराव कुरूडे, प्रतापराव पा़ चिखलीकर यांना प्रत्येकी एक वेळा संधी मिळाली़ तर रोहिदास चव्हाण यांना दोन वेळा संधी मिळाली़ २००९ मध्ये अशोकराव चव्हाण यांनी अत्यंत राजकीय डावपेचाने शंकरअण्णा धोंडगे यांच्यासाठी प्रतिष्ठा वापरली़ काँग्रेसच्या हक्काची विधानसभा राक़ाँ़ला गेल्याने पक्षात मरगळ आली़ २००४ साली विधानसभेत काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले चिखलीकर यांची राजकीय कोंडी झाली़ अशोकराव चव्हाण यांच्याशी घेतलेला राजकीय पंगा काँग्रेस उमेदवारी शेकडो मैल दूर घेवून गेली़ चिखलीकर विरोधात सर्वांची एकजुट झाली़ यासाठी राजकीय व्युहरचना अशोकरावांनी केली़ त्याला यश आले़ परंतु काँग्रेस पक्ष दुबळा झाला़ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष मजबूत होण्याकडे अधिक लक्ष दिले़ कंधार-लोह्यातील ऩप़ निवडणुकीत चिखलीकर विरोधात सर्व पुढारी एकत्रित आले़ परंतु चिखलीकरांना कंधार ऩप़मध्ये रोखण्यात अपयश आले़ लोह्यात मात्र चिखलीकराचा मनोरथ रोखण्यात आला़ हे शहकाटशहाचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीपुरते मर्यादित झाले़ २००४ साली लातूर लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार आवळे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा चिखलीकर यांच्याकडे होती़ त्यामुळे पुन्हा चिखलीकर विरोध झाला़ काँग्रेसच्या मोजक्या नेत्या-कार्यकर्त्याचा अपवाद वगळता काँग्रेस-राकाँने भाजपा उमेदवाराचा छुपा प्रचार केला़ त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघात भाजपाला १७ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली़ लातूर व लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघाच्या आघाडीमुळे आवळे निवडून आले़ २००९ ची लोकसभा निवडणूक नमोविरूद्ध काँग्रेस-राकाँ आघाडी अशीच झाली़ त्यात पुन्हा आघाडी धर्म कागदावर पाळण्यात आला़ परंतु मनोमिलन हे काँग्रेस-राकाँचे झाले नाही़ शेकापने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपा उमेदवाराची प्रचार यंत्रणा अ‍ॅड़मुक्तेश्वर धोंडगे यांनी हाती घेतली़ मोदीमय वातावरण आणि त्याचे मतात रुपांतर करण्यासाठी अ‍ॅड़धोंडगे यांनी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरूषोत्तम धोंडगे, बाबूराव कागणे, धोंडिबा भायेगावे, भानुदास गीते, वारकड गुरूजी, उत्तम चव्हाण, शरद मुंडे, गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुसळे आदींची साथ घेतली़ लोहा विधानसभा निवडणुकीला ५-६ महिन्याचा अवधी आहे़ परंतु लोकसभा निवडणुकीवरून मताच्या बेरीज-वजाबाकीची आकडेमोड मात्र जोरात चालू असून विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना मोठी राजकीय मशागत करावी लागणार आहे़ त्यातच चिखलीकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शंकरअण्णांच्या उमेदवारीला मोठा अडथळा येणार आहे़ सिंचनाची कामे करण्यावर भर दिला जात असताना ग्रामीण भागातील भाजपाला झालेले मतदान ही मोठी समस्या झाली आहे़ लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या लोहा विधानसभा मतदारसंघाची आघाडी नेत्रदीपक आहे़ भाजपा उमेदवाराला ९५ हजार २४९ तर काँगे्रसचे बनसोडे गुरूजी यांना ३६ हजार ९३३ मते मिळाली़ मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपाला तिप्पट मतांची आघाडी लोह्याने दिली़