औरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक दरवाजांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत विदारक होत चालली आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि महापालिका या गंभीर प्रकाराकडे अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. सोमवारी दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रोशनगेटला अचानक आगीने वेढले. आगीचे लोट उंच आकाशात दिसत होते. सिडको अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील दरवाजांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (पान ७ वर)
‘रोशन’ला आगीच्या झळा
By admin | Updated: March 1, 2016 00:31 IST