लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील बसस्थानकाच्या आगारातील कॅश विभागाला रविवारी पहाटे दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत ३० लाखांचे साहित्य जळून खाक झाले; जवळपास १६ लाख रूपयांची कॅश सुरक्षित स्थळी असल्याने मोठे नुकसान टळले. परळी व अंबाजोगाईच्या अग्निशामक दलाने दीड तासात आग आटोक्यात आणली. एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांसह पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.परळीच्या बस आगारातील कॅश विभागातील कर्मचारी तिसरी शिफ्ट नसल्याने रात्री बाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे ड्यूटी करून शनिवारी गेले होते. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास कॅश विभागास शॉर्ट सर्किटने आग लागली.आग लागल्याचे समजताच येथील एस.टी. कर्मचाºयांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परळी नगर परिषद, अंबाजोगाई नगर परिषद, परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण केल्याची माहिती आगार प्रमुख रणजित राजपूत यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पन्हाळकर, वावरे हे तळ ठोकून होते. वेगवेगळ्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे पन्हाळकर म्हणाले.
परळी आगारातील कॅश विभागाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:32 IST