शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन केंद्रांची वानवा

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

अशोक कांबळे, औरंगाबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़

अशोक कांबळे, औरंगाबादशहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची वानवा आहे़ निसर्गनिर्मित संकट अथवा काही आपत्ती आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी किमान ८ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत शहरात केवळ तीनच केंद्रे असून, त्यामध्येही अपुरी कर्मचारी संख्या आहे. विशेष म्हणजे सरकारची मान्यता असूनही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पाच अग्निशमन केंद्रांची उभारणी होऊ शकली नाही. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या घरात आहे़ औद्योगिकरणामुळे येत्या काही काळात शहराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. एखादे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित संकट ओढावले, तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात किमान ८ अग्निशमन केंद्रांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात सिडको, चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसर अशा केवळ तीनच ठिकाणी अग्निशमन केंदे्र आहेत. विशेष म्हणजे या तीन केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत़ त्यामुळे निम्म्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांच्यावर १८ ते २० तास काम करण्याची वेळ येत आहे़ शहरात आणखी पाच नवीन केंद्रे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाकडून केंद्र उभारणीसाठी कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत़ अपुरे कर्मचारीशहरात तीन ठिकाणी असलेल्या अग्निशमन कें द्रांमध्ये एकूण ८१ पदे मंजूर आहेत; परंतु सध्या ५१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० पदे रिक्त आहेत़ स्टेशन आॅफिसर १, उपअग्निशमन अधिकारी ४, अग्निशमनप्रमुख १, ड्रायव्हर आॅपरेटर ४, अग्निशामक १२, टेलिफोन आॅपरेटर ५ व लिपिक १ अशी पदे रिक्त आहेत़ अनेक वर्षांपासून वाढीव पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही़ विशेष म्हणजे कार्यरत असलेले कर्मचारी जवळपास ४० ते ५० या वयातील असल्याने त्यांना धावपळीचे काम करताना मर्यादा पडत आहेत़ स्वत:ची रुग्णवाहिका नाहीआपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन केंद्राकडे अद्याप स्वत:ची एकही रुग्णवाहिका नाही़ आपत्कालीन काळात अग्निशमन केंद्राला दुसऱ्यांच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते़ त्यामुळे अनेकदा रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावण्याची शक्यता निर्माण होते़ अग्निशमन कें द्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही़