शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

धारूर शहरामध्ये अग्नितांडव

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

धारूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील ८ दुकानांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाले

धारूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील ८ दुकानांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने हे आठही दुकानदार रस्त्यावर आले आहेत. या दुकानांतील सर्व माल जळून खाक झाला. या आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते. मात्र, पुढील एक दुकान जेसीबीने काढून ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रीच्या वेळीही हजारो नागरिक रस्त्यावर मदतीकरिता सरसावले होते.शहरातील मुख्य रस्त्यावर भरवस्तीमधील गजानन शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर असणाऱ्या दुकानाने शुक्रवारी रात्री अचानक पेट घेतला. बघता बघता आठ दुकानांना या आगीने वेढले. या आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की, माणूसही जवळ जाऊ शकत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला; मात्र या आगीचा उजेड गावाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागल्याने जागे असणारा प्रत्येक जण या घटनास्थळाकडे धावला.घटनास्थळी ही दुकाने आगीत भस्मसात होत असल्याचे पाहताच या दुकानातील माल बाहेर काढण्याचाही प्रयत्न झाला. धारूर न.प.च्या अग्निशामक दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी आले. त्याचबरोबर केज, अंबाजोगाई, कळंब, माजलगाव येथील वाहनेही तात्काळ बोलावण्यात आली. या आगीने रौद्रस्वरूप धारण करू नये यामुळे ही दुकानांची साखळी जेसीबीने तोडण्यात आली. या आगीमध्ये राम पिलाजी यांचे अपना जनरल स्टोअर्स, शिवकुमार पिलाजी यांचे सराफी दुकान, नेटके यांचे बुटाचे दुकान, बाबू कुंभार यांचे किराणा दुकान, सोनवणे यांचे बुटाचे दुकान, धनंजय पिलाजी यांची मोबाईल शॉपी, हेमंत पिलाजी यांचे जनरल स्टोअर्स व मोमीन यांचे हॉटेल आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. यामधील तीन ते चार दुकानदार अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्याने ते रस्त्यावर आले आहेत.ही आग पाहिल्यावर ती मंडळी ओक्साबोक्सी रडत होती. मात्र, त्यांना सावरण्याचा प्रयत्नही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्यांनी केला. बाजूच्या दुकानांना नुकसान होऊ नये म्हणून त्या दुकानातील साहित्यही बाहेर काढण्यात आले होते. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रीची वेळ असतानाही शहरातील हजारो नागरिक रस्त्यावर आले होते. रात्री पावणेबाराला लागलेली आग सकाळी पाच वाजता आटोक्यात आली. सकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. (वार्ताहर)