शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

शेंद्र्यात कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

करमाड : शेंद्रा एमआयडीसीमधील विद्युत ऊर्जा उत्पादन करणारी शेंद्रा ग्रीन एनर्जी कंपनीच्या आवारात असलेल्या वीज उत्पादन करणाऱ्या साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

करमाड : शेंद्रा एमआयडीसीमधील विद्युत ऊर्जा उत्पादन करणारी शेंद्रा ग्रीन एनर्जी कंपनीच्या आवारात असलेल्या वीज उत्पादन करणाऱ्या साहित्याला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली. शेंद्रा एमआयडीसीमध्ये डी सेक्टरमध्ये १९७ क्रमांकाच्या प्लॉटवर शेंद्रा ग्रीन एनर्जी ही वीज उत्पन्न करणारी कंपनी आहे. वीज उत्पादन करण्यासाठी लागणारा भुसा कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आला आहे. या भुशाचा वापर करून विजेची निर्मिती करण्यात येते. वीज निर्मिती करणाऱ्या मशीनपर्यंत भुसा मशीनद्वारे पट्ट्याचा वापर करून नेण्यात येतो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुसा साठविला आहे. तेथून मशीनद्वारे बेल्टपट्टाद्वारे भुसा ओढण्यात येऊन तो मुख्य मशीनपर्यंत पोहोचला जातो. या भुशाच्या सुरुवातीलाच बेल्टपट्टा तुटल्याने याठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागल्याचे समजते. त्यामुळे ही आग वाढत जाऊन कंपनीच्या आवारातील गंजी पेटत गेल्या. जोरात वाहणारी हवा व बारीक भुशाला आतून लागलेली आग त्यामुळे आग अधिकच भडकत गेली. शेंद्रा एमआयडीसीत अग्निशामक दलाची शाखा आहे.शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर चिकलठाणा व औरंगाबाद महानगरपालिकेचे अग्निशामक दल नेहमी तत्पर असते.रविवारी सकाळी १०.३० वाजता ही आग लागली. त्यानंतर तब्बल अडीच तासांनंतर शेंद्रा एमआयडीसीतील अग्निशामक दलाला आगीबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती अग्निशामक अधिकारी जगजितसिंग जाट यांनी सांगितले, तर याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले की, कंपनीला आग लागल्याबाबत आम्हाला दुपारी १२.३० वाजता माहिती मिळाली. आम्ही तात्काळ माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो.कंपनीचे प्रकल्प उपाध्यक्ष शिंदे यांना आगीबाबत विचारणा केली असता त्यांना माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. घटनास्थळी आगीबाबत कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गांभीर्य दिसून आले नाही; परंतु याठिकाणी एनआरबी कंपनीचे व्यवस्थापक पुजारी यांनी सौजन्य दाखवीत आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यामार्फत आग विझविण्यासाठी व बाजूला पेटलेले गवत पाणी टाकून विझवले. आग विझविण्यासाठी एमआयडीसी शेंद्रा, चिकलठाणा, बजाजच्या अग्निशामक बंबाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत प्रयत्न करीत होते.