शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

घराला आग लागून सहा लाखाचे साहित्य खाक

By admin | Updated: May 29, 2017 00:28 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़

लोकमत न्यूज नेटवर्कअणदूर : तुळजापूर तालुक्यातील चिवरी शिवारातील शेतातील एका घराला २७ मे रोजी रात्री अचानक आग लागली़ या आगीत संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व इतर संसारोपयोगी साहित्य असे सहा लाखाचे साहित्य जळून खाक झाले़अणदूर येथील चंद्रकांत शिवलिंग राजमाने हे चिवरी शिवारातील शिवराज कुताडे यांच्या शेतात राहतात़ राजमाने कुटुंबिय २७ मे रोजी रात्री उकाड्यामुळे घराबाहेर झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली़ कच्चे बांधकाम असलेल्या घराला गालेली आग वाऱ्यामुळे जास्तच पसरली़ लागलेली आग विझविण्यासाठी गेलेले विकास चंद्रकांत राजमाने (वय २४) हे २० टक्के भाजले आहेत़ त्यांना १०८ च्या रूग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले़ या आगीमध्ये दोन शेळ्या, बोक बोकडं सापडले असून, तेही भाजलेल्या अवस्थेत जिवंत आहेत़ ही आग आटोक्यात आणण्यासाठी युवराज मुळे यांचे पाण्याचे टँकर आणून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत राजमारे यांच्या घरावरील ४० पत्रे, १४ दंट्टे, तीन मोठी कवाडे, ८ पोती ज्वारी, ५ पोती गहू, ६ पोती मका, ५ पोती भुईमूग, २ पोती हरभरा, २ पोती तूर, १ पोते मूग, १ पोते पेंड, २ पोती भुसा, ५ पोती युरिया, १८ पोती डीएपी, रोख रक्कम ३५ हजार रुपये, संसारोपयोगी साहित्य, शेतातील महत्त्वाचे अवजारे, मोटार, पाईप असे जवळपास सहा लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले़ राजमाने कुटुंबियांच्या घरातील सदस्यांच्या अंगावरील कपडे वगळता एकही वस्तू आगीपासून शिल्लक राहिली नाही. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला असून, प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे़दरम्यान, आग विझविण्यासाठी केदार आलुरे व राम कोरे यांनी नळदुर्ग येथील अग्निशामक दलाला संपर्क साधला होता़ मात्र, गाडीमध्ये पाणी नाही म्हणून गाडी येवू शकत नाही असे उत्तर मिळाले़ त्यानंतर महावितरण कार्यालयात फोन करून १० ते १५ मिनिटे लाईट सुरू करा, आम्ही पाणी भरून घेऊन आग आटोक्यात आणू, अशी विनंती करण्यात आली होती़ मात्र, तरीही वीज सुरू करण्यात आली नाही़ नळदुर्ग येथील अग्निशमन दलाची गाडी किंवा महावितरणने रात्री वीजपुरवठा सुरू केला असता तर राजमाने यांच्या घरातील काहीतरी साहित्य वाचविण्यात यश आले असते, अशी प्रतिक्रीया घटनास्थळी उपस्थित नागरिक देत आहेत़ तर घटनेनंतर अणदूर सज्जाचे तलाठी दत्तात्रय बोंदर यांच्याशी संपर्क साधला असता, सकाळी पंचनामा करू, असे त्यांनी सांगितले़ मात्र, ते घटनास्थळी आलेच नाहीत. तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठीही घटनास्थळाकडे फिरकले नाहीत़ अणदूर येथील तलाठी कार्यालयातील सेवक गुंडू रजपूत यांनी घटनेचा पंचनामा केला़