शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१२०० लाभार्थ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:16 IST

अनुदानाचा पहिला हप्ता घेतल्यानंतर शौचालये न बांधणाºया तब्बल १२०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी आपल्याकडे शौचालय नसल्याचे पुरावे सादर करून अनुदान घेतले. मात्र, प्रत्यक्षात शौचालय बांधत नसल्याचे समोर आले आहे. अनुदानाचा पहिला हप्ता घेतल्यानंतर शौचालये न बांधणाºया तब्बल १२०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम वॉर्ड कार्यालयांवर सोपविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. शहरातील अनेक वसाहतींमधील नागरिक आजही उघड्यावर जातात. शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी केंद्राने प्रत्येक नागरिकाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली. ९ हजार नागरिकांनी अनुदानाची मागणी केली. अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ६ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. ८ हजार लाभार्थ्यांपैकी ६ हजार लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. अनुदान घेऊनही शौचालय न बांधणाºया लाभार्थ्यांना वॉर्ड कार्यालय, स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत सूचना देण्यात आली. १० महिने उलटले तरी शौचालयाचे बांधकाम केले जात नसल्याने अनुदान लाटणाºया लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. १२०० लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम खर्च झाल्याचे मनपा अधिका-यांना सांगितले. ५० लाभार्थ्यांवर पोलीस कारवाई केली आहे. वॉर्ड कार्यालयाकडून यादी प्राप्त होताच दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.