शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लघु उद्योजकांना गंडा घालणा-याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:37 IST

वाळूज एमआयडीसी परिसरात उद्योजकांना माल पुरविण्याचे, तसेच भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून अनेक लघु उद्योजकांना जवळपास अर्धा कोटीला गंडा घालणा-या एका उद्योजकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात उद्योजकांना माल पुरविण्याचे, तसेच भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून अनेक लघु उद्योजकांना जवळपास अर्धा कोटीला गंडा घालणाºया एका उद्योजकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, सुरेंद्र झा यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी परिसरात एस.के. प्रॉडक्ट हाऊस या नावाची कंपनी सुरूकेली होती. या कंपनीत हाऊस किपिंगसाठी लागणारे साहित्य तयार करून सुरेंद्र झा हा या साहित्याची शहर व औद्योगिक परिसरातील उद्योजक व व्यावसायिकांना विक्री करीत होता. दरम्यानच्या कालावधीत झा याने धनेश पाटील (रा. हर्सूल परिसर) यास कंपनीत भेटीला बोलावून आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करू, अशी थाप मारून १० लाखांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. या व्यवसायात चांगला अर्थिक फायदा होण्याचे झा याने आमिष दाखविल्यानंतर धनेश पाटील यांनी वेगवेगळ्या धनादेशाद्वारे झा यांच्या बँक खात्यावर ५ लाख ७० हजार रुपये जमा केले. ही रक्कम मिळाल्यानंतर झा व पाटील यांनी सुदर्शन इंटरप्रायजेस या नावाची कंपनी स्थापन के ली होती. भागीदारीत कंपनी सुरू झाल्यानंतर झा यांनी सर्व व्यवहार स्वत:कडे ठेवून पाटील यांना कुठलाही हिशोब दिला नाही. कंपनीच्या व्यवहाराची माहिती व हिशोब देत नसल्यामुळे पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे झा याने १० लाखांचा धनादेश पाटील यांना दिला होता; मात्र हा धनादेश न वटल्यामुळे, तसेच झा पैसे परत देत नसल्यामुळे धनेश पाटील यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आपली १० लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.उद्योजक सुरेंद्र झा याने धनेश पाटील यांच्याबरोबर शबाना शेख, किरण डिके, त्रिरत्न गंगावणे, विशाल जोगदंडे, रोहित तायडे, राजेंद्र काळे आदी लघु उद्योजकांकडून जवळपास ३८ लाख ७८ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारी फसवणूक झालेल्या या लघु उद्योजकांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे केल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्त यादव यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.