शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘गगन’मुळे जवळच्या हवाई मार्गांचा शोध

By admin | Updated: May 26, 2016 00:05 IST

औरंगाबाद : भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इस्त्रो या दोन्ही संस्थांनी मिळून गगन (जीपीएस जिओ आॅगमेंटेड नेव्हिगेशन) ही स्वदेशी बनावटीची नेव्हिगेशन प्रणाली तयार केली आहे

औरंगाबाद : देशातील विमानसेवा अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इस्त्रो या दोन्ही संस्थांनी मिळून गगन (जीपीएस जिओ आॅगमेंटेड नेव्हिगेशन) ही स्वदेशी बनावटीची नेव्हिगेशन प्रणाली तयार केली आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचण्यासाठी जुन्या प्रणालीत बराच वेळ लागतो; परंतु गगन प्रणालीमुळे जवळचा हवाई मार्ग शोधणे शक्य झाल्याने इंधनाची मोठी बचत होण्यास मदत होते, असे एव्हिएशन सेफ्टीचे संचालक एस. व्ही. सतीश यांनी सांगितले.विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणेविषयी तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा बुधवारी समारोप झाला. याप्रसंगी एस. व्ही. सतीश यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय, उपमहाप्रबंधक शरद येवले, वरिष्ठ प्रबंधक (इलेक्ट्रिकल) अमिताभ रुंगटा, सहायक प्रबंधक (एचआर) सुरेश महंती, पूजा मूल, जी. चंद्रशेखर, सी. कबाडी आदींची उपस्थिती होती. यावेळी एस. व्ही. सतीश यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.ते म्हणाले, भारतात २००३ पासून गगन प्रणालीवर काम सुरू आहे. २०१३ मध्ये ही प्रणाली विकसित करण्यात आली. यासाठी इस्त्रोने तीन उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीपेक्षा गगन ही प्रणाली २० पटींनी अधिक स्पष्ट असणारी प्रणाली आहे. सध्या देशातील १५ विमानतळ गगन प्रणालीने सज्ज आहेत. या प्रणालीचा वापर वनक्षेत्राचे सर्वेक्षण, रेल्वे क्रॉसिंग यासह इतरही क्षेत्रांतही सुरू आहे.