शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

दस्तावेज मिळेनात

By admin | Updated: July 23, 2016 01:08 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांना पुरेसे कागदपत्र मिळत नसल्याने तपासाची गती मंदावली आहे

व्यंकटेश वैष्णव , बीडतालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांना पुरेसे कागदपत्र मिळत नसल्याने तपासाची गती मंदावली आहे. याबाबत सहायक निरीक्षकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शुक्रवारी पत्र पाठवून तात्काळ माहिती न दिल्यास आपण दोषींना पाठीशी घालतात असे समजण्यात येईल, असा इशारा सहायक निरीक्षकांनी पत्राद्वारे दिला आहे.बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्या फिर्यादीवरून बीड तालुक्यातील पिंपळनेर ठाण्यात ताडसोन्ना येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासादरम्यान ज्या काळात स्वस्त धान्य घोटाळा झाला, त्या दरम्यान कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मूळ दस्ताएवजांची फाईल पोलिसांनी मागितली आहे. यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी पिंपळनेर पोलिसांनी मागितलेली काही महत्त्वाची कागदपत्रे दिलेली असल्याचे सूत्रांकडून समजते.बीड तालुक्यातील पिंपळनेर व बीड गोदामाचा तत्कालीन पदभार नेमका कोणाकडे होता, तेव्हा दिलेले परमिट कोणाच्या स्वाक्षरीवरून देण्यात आले, स्वस्त धान्य दुकानदारास एका महिन्यात एका नंबरच्या परमिटवर एच रजिस्टरला नोंद करून धान्य देता येते काय, देता येत असल्यास जी.आर.ची सत्यप्रत देण्यात यावी, अशी मागणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस सहनिरीक्षक यांनी पत्राद्वारे केली आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत सर्व माहिती पोलिसांना मिळाली असली तरी धान्य घोटाळा प्रकरणात २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या काळामध्ये संबंधित गोदामाचा अव्वल कारकून चार्ज कोणाकडे होता, त्यांना चार्ज दिल्याची आॅर्डर आहे का? असेल तर त्याची एक प्रत द्यावी, अशी मागणी पिंपळनेर पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे.२३ जुलैपर्यंत पुरवठा विभागाकडून माहिती न मिळाल्यास व या प्रकरणात आरोपींना जामीन झाल्यास याला आपण सर्व (पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी) जबाबदार रहाल. शिवाय आरोपीस मदत करतात, असे समजण्यात येईल, अशी तंबी पिंपळनेर पोलिसांनी पुरवठा विभागाला दिली आहे. बीड तहसील कार्यालयांतर्गत पिंपळनेर येथील गोदामाचा पदभार ज्या कर्मचाऱ्यांकडे होता, त्यांच्याकडून सर्व मूळ कागदपत्रांची मागणी केली जात आहे. यातील काही रेकॉर्ड शोधूनही मिळून येत नसल्याने मागील आठ दिवसांपासून मूळ दस्तावेजाची शोधाशोध सुरू आहे.४या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पिंपळनेर पोलिसांना मात्र पुरेशा दस्तावेजाअभावी तपासात गती मिळत नसल्याने शेवटी पिंपळनेर पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र काढून माहिती न मिळाल्यास व संबंधित आरोपींना जामीन मिळाल्यास सहआरोपी करण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती अजून वाढतच चालली आहे.