शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये पोस्ट बँकेकडून आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:33 IST

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात भारतीय डाक विभागाने ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपये वाटप केले. याच काळात ...

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात भारतीय डाक विभागाने ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपये वाटप केले.

याच काळात बँकेच्या सेव्हिंग खात्यात २०४ कोटींचे व्यवहार झाले.

कोरोनाच्या संसर्ग वाढू नाही म्हणून देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या अत्यंत कठीण काळात भारतीय डाक विभागातील कर्मचारी कोविड योद्ध्याप्रमाणे जनतेची सेवा करीत होते. एकीकडे बँक सेवा देत होत्या; पण लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. भारतीय डाक विभागांतर्गत इंडियन पोस्ट पेमेन्टस्‌ बँकअंतर्गत पोस्टमनने औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील ५ हजार लोकांच्या घरी जाऊन अडीच कोटी रुपयांचे पेमेंट केले. त्या लोकांचे अन्य कोणत्याही बँकेत अकाउंट असले तरी त्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम घरी नेऊन देत त्यांची आर्थिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला.

पोस्ट पेमेन्टस्‌ बँकेत या काळात सेव्हिंग खात्यात १ लाख ७० हजार वेळ व्यवहार झाले. त्याद्वारे लोकांनी २०४ कोटी रुपयांचे व्यवहार केले.

याशिवाय एक हजार लोकांनी मनीऑर्डर केल्या. यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी लोकांना बँकेत जावे लागले नाही. उन्हा-पावसात रांगेत उभे राहावे लागले नाही. लोकांना बँकेतील रक्कम थेट त्यांच्या घरी नेऊन देण्यासाठी ६५७ पोस्टमन व ग्रामीण पोस्ट सेवकांनी आपली सेवा बजावली.

चौकट

दीड हजार लोकांना घरपोच औषधी

लॉकडाऊनच्या काळात पोस्ट खात्याने मनीऑर्डर, घरपोच रक्कम देण्याचे काम तर केलेच. याशिवाय याच काळात १,५०० लोकांना औषधी व अत्यावश्यक वस्तू नेऊन दिल्या. या सेवेचा ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा झाला.

चौकट

अडीच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती

लॉकडाऊनच्या काळात इंडियन पोस्ट पेमेन्टस्‌ बँकेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी खाती उघडली. शिष्यवृत्तीसाठी ही खाती उघडण्यात आली.

चौकट

पोस्ट विभागाने निर्माण केला आदर्श

कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले असताना पोस्ट विभागाचे कर्मचारी जनतेला घरपोच सेवा देत होते. कोविड योद्ध्याचे काम आमच्या पोस्टमन, ग्रामीण पोस्ट सेवक व अन्य कर्मचाऱ्यांनी केले. यामुळेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील ४७ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल कोरोना योद्ध्याचा पुरस्कार मिळाला.

-जि. शिव. नागराजू,

प्रवर अधीक्षक डाक विभाग