शासनाची मका खरेदी करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही मका खरेदीकरिता मका खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी मका पिकाचे भाव कमी केले असून, प्रति क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.
तालुक्यात ४१९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, सदरील शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑनलाइन नोंदी करूनसुद्धा खरेदी न झाल्यास शासनाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. खुलताबाद खरेदी-विक्री संघाच्या वतीने सांगण्यात आले की, अद्याप मका खरेदी करण्याचे आदेश नाहीत. ते प्राप्त होताच मका खरेदी सुरू केली जाईल.
--------------
सध्या बाजारात शेतकऱ्यांच्या मक्याची अत्यंत कमी किमतीत खरेदी केली जात आहे. त्यासाठी शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. ३० जून खरेदी करण्याची अंतिम तारीख आहे. १ मे रोजी केंद्रे सुरू केली जातील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मका खरेदी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- अनिल पाटील, शेतकरी, सुलतानपूर