शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अखेर चंदनझिऱ्यात स्वतंत्र ठाणे

By admin | Updated: August 22, 2014 00:57 IST

चंदनझिरा : चंदनझिरा पोलिस ठाण्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

चंदनझिरा : चंदनझिरा पोलिस ठाण्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.या परिसरामध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी कारवाया थांबविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. पोलिसांना नागरिकांचे सहकार्य असल्याशिवाय या गुन्हेगारीला आळा घालणे शक्य नाही. तक्रारकर्त्याची पोलिसांनीही दखल घेतली पाहिजे, असे मत अमितेशकुमार यांनी यावेळी व्यक्त केले.पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, चंदनझिरा पोलिस ठाण्यांतर्गत २२ गावे तर १० उपनगरांचा समावेश होतो. शहरामध्ये पहिले तीन ठाणे होते. आता या ठाण्यांतर्गत येणारी गावे व उपनगरे या चंदनझिरा पोलिस ठाण्यांतर्गत येणार असल्याचे सांगितले. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली होती. त्यामुळे पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून यापुढे या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास ज्योतिप्रिया सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.या ठाण्यांतर्गत चंदनझरा, बजाजनगर, नॅशनल नगर, नागेवाडी, शिक्षक कॉलनी, द्वारकानगर, रामतीर्थ, ढवळेश्वर, नविन मोंढा, कन्हैय्यानगर, हिंद नगर, तांदुळवाडी, खादगाव, आंबेडकरनगर, निधोना, मांडवा, सिंधी पिंपळगाव, तातेवाडी, मानदेऊळगाव, पिरपिंपळगाव, बावणे पांगरी, दगडवाडी, पठाण देऊळगाव, तुपेवाडी, आसरखेडा, हिवराराळा, आन्वी, नजीक पांगरी, चितोडा, आसोला, घाणेवाडी, गुंडेवाडी आदी गावांचा समावेश होतो. चंदनझिरा पोलिस ठाण्यात ३४ पोलिस कर्मचाऱ्यांचा स्टाफ राहणार आहे. या कार्यक्रमाला पोलिस उपअधीक्षक आय. व्ही. वसावे, पोलिस उपाधीक संदीपान कांबळे, विक्रांत देशमुख, चंदनझिरा पोलिस ठशण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सदर बाजारचे पोनि संतोष पाटील, पोनि विद्यानंद काळे, पोनि विभुते, माजी नगरसेवक गणेश राऊत, नगरसेवक जगन्नाथ चव्हाण, राधाकिसन दाभाडे, शांतीलाल राऊत, दाऊदभाई, रौफभाई, हबीम खान, रंगनाथ एकंडे, विजय खरात, प्रभाकर पवार, छगन लिंबोने आदी उपस्थित होते. (वार्ताहर)