शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निमशिक्षकांच्या ज्येष्ठता यादीला मुहूर्त !

By admin | Updated: November 16, 2016 00:08 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता

उस्मानाबाद : जिल्हा परिषदअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. बारावी ‘सायन्स’ असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यास हिरवा कंदिल दिला. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निमशिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. शासन आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरातील पात्र असलेल्या जवळपास १२६ निमशिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्धही करण्यात आली आहे. त्यामुळे निमशिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत निमशिक्षकांच्या नियुक्तीचे भिजत घोंगडे एक -दोन नव्हे, तर तब्बल चार ते पाच वर्षांपासून कायम होते. नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी संबंधित शिक्षकांनी सातत्याने आंदोलने, उपोषण केली. मंत्रालयस्तरापर्यंत निवेदनेही दिली. परंतु, सदरील प्रश्न मार्गी लागता लागत नव्हता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या कार्यकाळात जवळपास ८२ निमशिक्षकांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु, सदरील नियुक्त्या देताना, ज्येष्ठता यादी डावलल्याचा आरोप उर्वरित निमशिक्षकांनी केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया चौकशीच्या फेऱ्यात सापडली होती. सातत्याने आरोप होऊ लागल्यानंतर सदरील प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समितीने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी केली. चौकशीअंती समितीनेही सदरील प्रक्रिया राबविताना ज्येष्ठता यादी डावलल्याचा ठपका ठेवला होता. हे सर्व घडत असतानाच नियुक्ती न मिळालेल्या निमशिक्षकांनी न्यायालयातही धाव घेतली होती. तयावर न्यायालयामध्ये जिल्हा परिषदेकडून म्हणणे सादर करण्यात आले होते. नव्याने ज्येष्ठता यादी तयार करून गुरूजींना नियुक्ती देऊ, असे न्यायालयात सांगण्यात आले होते. दरम्यानच्या काळात नियुक्ती दिलेल्या संबंधित ८२ गुरूजींना कार्यमुक्त करण्यात आले. या प्रक्रियेनंतर लागलीच ज्येष्ठता यादी तयार करून उपलब्ध रिक्त जागेवर निमशिक्षकांना नियुक्ती देणे अपेक्षित होते. परंतु, जिल्हाभरात प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त नसल्याने शिक्षण विभाग पेचात सापडला होता. दरम्यानच्या काळात संबंधित सर्व गुरूजींनी मिळून आंदोलनही केले. परंतु, रिक्त जागाच नसल्याने शिक्षण विभागही हतबल होता. त्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी बारावी सायन्स असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर गुरूजींच्या रिक्त जागेवर नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावासाठी वेळावेळी पाठपुरावा करण्यात आल्यानंतर शासनाने अखेर त्यास मंजुरी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे निमशिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून १२६ शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात येत होती. सदरील यादीचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ नाव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र निमशिक्षकांना दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)